प्राण्यांसाठी वाघ्या फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद



 प्राण्यांसाठी वाघ्या फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद 

डॉ.सतिष सोनवणे : हॉस्पिटलतर्फे प्राण्यांवर उपचारासाठी प्रथमोपचार किट भेट

 वेब टीम  नगर: वाघ्या फाऊंडेशनची सामुहिक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत प्राण्यांवर होत असलेले हल्ले, त्यांची घ्यावयाची काळजी,  भटक्या प्राण्यांची सुरक्षितता, औषधोपचार, त्यांचा खाण्या-पिण्याचे प्रश्‍न या विषयी नागरिकांमध्ये जागृती करण्याचे नियोजन करण्यात आले. या बैठकीस अध्यक्ष सुमित वर्मा, अमित वाकचौरे, अ‍ॅड.हर्षद कटारीया, अमोल कनगरे, अमित सोनग्रा,अनुरीता झगडे, सायली आठरे, राधिका रणभोर, डॉ.किर्ती बेलेकर, सागर कुलांघे, शुभम शिरसाट आदि उपस्थित होते.

या बैठकीत वाघ्या फाऊंडेशनच्या माध्यमातून मुक्या प्राण्यांसाठी चालू असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मॅक्सकेअर हॉस्पिटलतर्फे वाघ्या फाऊंडेशनच्या प्राणी मित्रांना प्राण्यांवर उपचारासाठी प्रथमोपचार किट देण्यात आले. या वेळी मॅक्सकेअर समुहाचे डॉ.प्रदीप पठारे, डॉ.आनंद काशिद, डॉ.सतिष सोनवणे उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. सतिष सोनवणे म्हणाले, आज सोशल मिडियांमुळे  मुक्या प्राण्याबद्दल आस्था, प्रेम वाटत असले तरी विविध प्राण्याविषयी भिती व गैरसमजही आहेत. या गैरसमजातून प्राण्यावर हल्ले, त्याविषयी तिरस्कार निर्माण होत आहे. त्यामुळे प्राण्यांवर होणार्‍या हल्ल्यांचे प्रमाणही  वाढले आहे. पशु-पक्षी हे मानवाचे सहयोगी  आहेत. त्यामुळे त्यांची  काळजी घेतली पाहिजे. नगरमध्ये वाघ्या फाऊंडेशनच्या माध्यमातून प्राणी मात्रांसाठी सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असेच आहे, त्यांच्या कार्यास प्रथमोचार किटच्या माध्यमातून छोटीशी मदत केली आहे. यापुढील काळातही त्यांच्या उपक्रमांना सहकार्य राहील, असे सांगितले.

  याप्रसंगी सुमित वर्मा म्हणाले, वाघ्या फौंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्यात अनेकजण सहभागी होत आहे, ही आनंददायी बाब आहे. मुक्या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी वाघ्या फाऊंडेशन पुढाकार घेत  आहे. याबाबत विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. मॅक्सकेअर हॉस्पिटलच्यावतीने देण्यात आलेल्या सहकार्यामुळे आम्हास प्राणीमात्रांसाठी काम करण्यास प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितल

    कार्यक्रमाच्या प्रास्तविकात अ‍ॅड.हर्षद कटारिया यांनी फाऊंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला.  सूत्रसंचालन अमोल कनगरे यांनी केले तर सायली आठरे यांनी आभार मानले.


Post a Comment

0 Comments