सफाई कामगार कचरा वेचकांना रोजगार मिळवून देऊ

 

सफाई कामगार कचरा वेचकांना रोजगार मिळवून देऊ 

आ.जगताप : 200 कचरा वेचकांना केंद्र सरकारचे प्रमाणपत्र वाटप


वेब टीम नगर  :कचरा गोळा करुन त्यावर उपजिविका करणा-या कचरा  वेचक  शहर स्वच्छ करण्यास मदत  करतात आणि ओला - सुका कचरा वेगळा करतात .त्यांना महापालिकाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देऊ असे आश्र्वासन आ.संग्राम जगताप यांनी कचरा वेचकांना प्रमाणपत्राचे वाटप करतांना दिले.या छोटेखानी समारंभाचे अध्यक्ष म न पा विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर होते.

कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीच्या वतीने या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

घर-टू घर २०रु.मानधन मिळवत कचरा गोळा करुन ओला-सुका कचरा वेगळा करण्याचे काम ते करतात मात्र घटांगाडीत कचरा एकत्र येतो आणि कचरा वेचकांना कचरा मिळत नाही असे आयोजक विकास उडाणशिवे यांनी प्रारंभी सांगितले.प्रशिक्षण दिलेल्या २०० कचरा वेचकांना प्रमाणपत्राबरोबर५००रु.मानधन देण्यात येणार आहे त्याची आज सुरुवात करण्यात आली होती.


Post a Comment

0 Comments