भारताचे ‘के’ क्षेपणास्त्र कुटुंब झाले अधिक सक्षम

 






भारताचे  ‘के’ क्षेपणास्त्र कुटुंब झाले अधिक सक्षम

 चीन-पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा...

वेब टीम मुंबई :पूर्व लडाख सीमेवर भारत आणि चीनमध्ये प्रचंड तणावाची स्थिती असताना शनिवारीच भारताने एक महत्त्वपूर्ण चाचणी केली. या चाचणीमुळे युद्धप्रसंगात भारताची अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता आणखी वाढली आहे. महत्त्वाचं म्हणजे भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बळावर हे घातक शस्त्र विकसित केलं आहे.

सुपरसॉनिक ब्रह्मोस पाठोपाठ भारताने शनिवारी शौर्य या अण्वस्त्र वाहून नेऊ शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. शौर्य ही पाणबुडीतून डागल्या जाणाऱ्या के-१५ क्षेपणास्त्राची पुढची आवृत्ती आहे. के-१५ पाणबुडीतून तर शौर्य क्षेपणास्त्र जमिनीवरून डागता येते. ही दोन्ही बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून ‘के’ मिसाइल कुटुंबाचा भाग आहेत. शौर्यचं यश हे चीन-पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा आहे . 

Post a Comment

0 Comments