गटबाजी नव्हे ; आदेशानुसारच धरणे आंदोलन : बाळासाहेब भुजबळ गटबाजी नव्हे ;  आदेशानुसारच धरणे आंदोलन : बाळासाहेब भुजबळ 

 

वेब टीम नगर- म.गांधी जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी  आणि केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी धरणे आंदोलन काल २ ऑक्टॉबर रोजी म. गांधी जयंती दिनी करण्यात आली मात्र काही वृत्तपत्रांनी त्यास गटबाजीचे स्वरूप देऊन या धरणे अनोलनाच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. मात्र कालचे धरणे आंदोलने हे  गटबाजीतून नव्हे तर पक्षाच्या आदेशानुसारच करण्यात आल्याची माहिती शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी दिली. 

किरण काळे यांची १४ ऑगस्ट रोजी शहर जिल्हाध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली. हि नेमणूक होण्यापूर्वी मी स्वतः या पदासाठी इच्छुक होतो, मात्र पक्षाध्यक्षांनी किरण काळे यांची नियुक्ती जाहीर केली. हि नियुक्ती आम्ही दिलखुलास पणे मान्य केली. कोणताही विरोध व प्रतिक्रिया न देता पक्षादेश मानला. 

आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी माउली संकुलात आढावा बैठक घेतली आम्हीही तेथे सहभागी झालो होतो.त्यानंतर पक्षाध्यक्षांनी "माझे कुटुंब माझा परिवार" या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यावेळीही आम्ही हजर होतो याच कार्यक्रमात किरण काळे यांचे कौतुक करताना प्रदेशाध्यक्ष ना.थोरात यांनी कलेले  काम जरूर  चांगले आहे मात्र नगर शहरात पक्ष जिवंत ठेवण्याचे काम बाळासाहेब भुजबळ यांनी केले हे विसरून  चालणार नाही असेही उद्गार काढले. असे असताना म.गांधी जयंती दिनी दोन ठिकाणी धरणे आंदोलने झाल्याने त्याला वृत्तपत्रांनी गटबाजीचे स्वरूप देणे योग्य नव्हे, उलटपक्षी पक्षाने शहर जिल्हाध्यक्ष , शहर ब्लॉक कमिटी अध्यक्ष , युवक काँग्रेस आणि पक्षाच्या अन्य शाखांनाही कार्यक्रम करण्याविषयीचे पत्रक पाठविले होते त्यानुसारच आम्ही वाडियापार्क येथील म.गांधी पुतळ्या जवळ तर किरण काळे यांनी मार्केट कमिटी येथे धरणे आंदोलन केले. हि दोन्ही आंदोलने पक्षाच्या आदेशानुसारच झाली त्याला गटबाजीचा कोणताही  वास नाही असेही बाळासाहेब भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते प्रदेशाध्यक्षांना मानणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे असा  गैरसमज पसरविणारे वृत्त कोणीही पसरवू नये अशी विनंती बाळासाहेब भुजबळ यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments