अटल बोगद्याचे केलं मोदींनी लोकार्पण

 


अटल बोगद्याचे  केलं  मोदींनी लोकार्पण 

१० हजार फूट उंचीवर सर्वाधिक लांबीच्या  बोगदाचे उद्घाटन.


वेब टीम  रोहतांग: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहतांग येथील अटल बोगद्याचे  उद्घाटन केलं सुमारे दहा हजार फूट  उंचीवर बनवण्यात आलेल्या सर्वाधिक लांबीचा हा बोगदा असून त्याची लांबी 9.2 किमी इतकी आहे हा बोगदा  तयार होण्यास दहा वर्षाचा कालावधी लागला.

हिमालयातील पर्वत रांगांमध्ये रोहतांग जवळ लेह-  मनाली राज्य महामार्गावर  हा बोगदा बनवण्यात आला असून मनाली आणि लेह यामधील अंतर ४६ किलोमीटरने कमी झाले आहे . आणि चार तासांचा प्रवासवाचला आहे. या बोगद्याचे नामकरण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावर ठेवण्यात आले  आहे. 



उद्घाटनानंतर एचआरटीसी या बसला हिरवा झेंडा दाखवून  15 स्थानिक ज्येष्ठ व्यक्तींबरोबर पंतप्रधानांनी या रस्त्याने प्रवास केला. पंतप्रधान आपल्या भाषणात पुढे म्हणाले  आज फक्त अटलजींचे  स्वप्न पूर्ण झालं नाही  तर  हिमाचल प्रदेशातील कोट्यावधी लोकांची प्रतीक्षासंपली  अटलबोगद्याचा लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो . लोकार्पणाच्या  थाटामाटात आपण राबलेल्या हातांना  विसरतो , ज्यांनी आपल्या मेहनतीने हा बोगदा खोदण्याचे काम केलं त्या सर्वच मजूर ,अभियंत्यांचे अभिनंदन, स्वागत करतो हा बोगदा  पायाभूत सुविधाना   ताकत देणार आहे.  तज्ञांच्या मते 2014मध्ये अटल टनेल काम सुरू  करण्यात आलं .हे काम पूर्ण होण्यास दहा वर्ष लागली. 







Post a Comment

0 Comments