भाजयुमोच्या अध्यक्षपदासह कार्यकारिणीला स्थगिती

 भाजयुमोच्या अध्यक्षपदासह कार्यकारिणीला स्थगिती 

वेब टीम नगर- भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्च्याची कार्यकारिणी जाहीर करताना आपल्याला विश्वासात  न घेतल्याने दक्षिण जिल्हाध्यक्ष  अरुण मुंढे चांगलेच संतापले. युवा मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम यांनी कार्यकारिणी जाहीर करताना पूर्व परवानगीही न घेतल्याने या नियुक्त्या नियमाला धरून नसल्याने सत्यजित कदम यांच्या जिल्हाध्यक्ष पदासह कार्यकारिणीच्या निवडीला अरुण मुंढे यांनी स्थगिती दिली आहे. 

मुंढे यांनी काढलेल्या आदेशात सत्यजित कदम यांना आपण  घोषित केलेली जिल्ह्याची कार्यकारिणी नियमाला धरून नसल्याचे तसेच कार्यकारिणी घोषित करण्या अगोदर माझ्याशी चर्चा करून व माझी संमती घेऊन घोषित करणे उचित होते मात्र आपण तसे न करता कार्यकारिणी परस्पर घोषित केली असून ती कार्यकारिणी " प्रदेशने " घालून दिलेल्या नियमानुसार नसल्याने मी भाजप जिल्हाध्यक्ष दक्षिण या नात्याने युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आणि युवा मोर्चा कार्यकारिणीला स्थगिती देत आहे असे पत्र त्यांनी सत्यजित कदम यांना पाठवले आहे. 

या पत्रामुळे  भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले असून पुढील काळात पक्षात कश्याप्रकारचे पडसाद उमटतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Post a Comment

0 Comments