आरोग्य आहार

आरोग्य आहार 

कणकेचे लाडू 

साहित्य : २ वाटी जाडसर कणिक , १ वाटी सुके खोबरे ,१ वाटी डिंक , पाव वाटी बदाम, पाव वाटी अक्रोड, ४ वाटी सेंद्रिय गूळ ( कमी गोड करण्यासाठी ३ वाटी गूळ सुद्धा पुरे होतो . आवडीनुसार घालणे ). 

तयारी : खोबरे किसून मिक्सरवरबारीक करून घेणे. डिंक मिक्सरवर बारीक करून घेणे ( डिंक कच्चाच वापरणे ).बदाम आणि अक्रोड जाडसर भरड करून घेणे. गूळ  बारीक किसून घेणे. 

कृती : २ वाटी कणिक  गायीच्या तुपावर चांगली गुलाबीसर भाजून घेणे. ती कणिक काढून घेऊन त्याच गरम कढईत टाकणे म्हणजे तो गूळ पातळ होतो. त्यामध्ये भाजलेली गरम कणिक बारीक केलेला डिंक , बारीक केलेला खोबरे , बदाम व अक्रोड भरड टाकणे. चांगले एकत्रित करून लाडू वळून घेणे. गरज  पडल्यास गायीचे तूप टाकणे. 

लाडूतील सर्वच घटक खूपच पौष्टिक असल्या कारणाने लाडू खूपच चविष्ट व पौष्टिक होतात. Post a Comment

0 Comments