जागतिक रेबिज दिनानिमित्त श्‍वानांचे मोफत लसीकरण

 

जागतिक रेबिज दिनानिमित्त श्‍वानांचे मोफत लसीकरण

मुक्या प्राण्यांसाठी वाघ्या फौंडेशन काम करणार - सुमित वर्मा

वेब टीम   नगर : आज निसर्गाचे चक्र बिघडत चालले आहे. बेसुमार वृक्षतोड, पशु-पक्षांच्या कत्तली. नैसर्गिक संपदा नष्ट होत असल्याने जंगलातील पशु-पक्षी शहरात येत आहे. त्याचा मानवी जीवनावरही परिणाम होत आहे. हे निसर्गचक्र सुरु ठेवण्यासाठी जगा आणि जगू द्या या भावनेने काम केले पाहिजे. आज अनेक पशु-पक्षांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे. यासाठीच वाघ्या फौंडेशनच्या माध्यमातून प्राणीमात्रांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेत आहे. आज जागतिक रेबीज दिनानिमित्त पाळीव श्‍वानांना लसीकरण करुन काळजी घेण्यात येत आहे.  अशाच उपक्रमांद्वारे पशु-पक्षांचे संरक्षण करण्यासाठी वाघ्या फौंडेशन पुढाकार घेणार आहोत. संस्थेच्या माध्यमातून मुक्या प्राण्यांसाठी खाद्यपदार्थ, औषधोपचार, शस्त्रक्रिया संदर्भात काम करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन फौंडेशनचे अध्यक्ष सुमित वर्मा यांनी केले.

     जागतिक रेबीज दिनानिमित्त वाघ्या फौंडेशनच्यावतीने पशुवैद्यकीय चिकित्सालय येथे श्‍वानांवर मोफत रेबिज लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी वाघ्या फौंडेशनचे अध्यक्ष सुमित वर्मा, डॉ.सचिन क्षीरसागर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.शशिकांत कारखिले, सायली आठरे, राधिका रणभोर, अ‍ॅड.हर्षद कटारिया, अमोल कनागरे, अमित वाकचौरे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी डॉ.शशिकांत कारखिले म्हणाले, समस्त प्राणीमात्रा ही आपली संपत्ती आहे, तीचे सर्वांनी रक्षण केले पाहिजे. वाघ्या फौंडेशनच्यावतीने घेण्यात येत असलेल्या उपक्रमांमुळे सर्वसामान्यांमध्ये प्राण्यांविषयी प्रेम निर्माण होण्यास मदत होईल. रेबिज दिनानिमित्त श्‍वानांना लसीकरण दरवर्षी मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते, परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर यंदा टप्प्याटप्प्याने करण्यात करण्यात येणार आहे. रेबिज आजार होऊ नये यासाठी लसीकरण आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या श्‍वानांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

     याप्रसंगी सायली आठरे म्हणाल्या, आज अनेक ठिकाणी मोकाट मुक्या प्राण्यांवर बरेच अन्याय केले जातात. शेपटीला फटाके बांधणे, रंग टाकणे, दगड मारणे असे प्रकार होत आहेत. हे रोखण्यासाठी वाघ्या फौंडेशन पुढाकार घेणार असल्याचे सांगून प्राणीप्रेमीनी फौंडेशनशी जोडले जावे, असे सांगितले.

     यावेळी उपस्थितांनी  वाघ्या फौंडेशनच्यावतीने घेण्यात असलेल्या उपक्रमांचे कौतुक करुन संस्थेच्या कार्यात सहभागी होणार असल्याचे सांगितले. शेवटी अ‍ॅड.हर्षद कटारिया यांनी प्राणी कायद्याविषयी मार्गदर्शन करुन आभार मानले.

Post a Comment

0 Comments