अंत्योदय , प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना सप्टेंबरमध्ये एक किलो चणाडाळ मोफत वितरण



 अंत्योदय , प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना 

 सप्टेंबरमध्ये  एक किलो चणाडाळ मोफत वितरण

          वेब टीम नगर : कोरोना विषाणूच्‍या पार्श्‍वभुमीवर प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेअंतर्गत  अंत्‍योदय अन्‍न योजना व प्राधान्‍य कुटुंबातील लाभार्थ्‍यांना लक्ष्‍य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्‍थेअंतर्गत जूलै 2020 ते सप्टेंबर 2020 या कालावधीकरीता प्रतिमाह प्रती शिधापत्रिका एक किलो चणाडाळ मोफत वितरीत करण्‍यात येणार आहेत. सद्य परिस्थितीत चणाडाळीचे नियतन प्रत्‍येक तालुक्‍यास प्राप्‍त होत आहे. त्‍यानुसार लाभार्थ्‍यांनी प्रति शिधापत्रिका एक किलो प्रमाणे माहे सप्‍टेंबर 2020 ची  मोफत चणाडाळ आपले स्‍वस्‍त धान्‍य दुकानातुन घेवुन जावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी केले आहे. तसेच, माहे जूलै 2020 व ऑगस्‍ट 2020 चे मोफत चणाडाळ वितरण करणेकरीता ई-पॉस मशिनवर मुदतवाढ देणेत आलेली आहे. माहे जूलै व ऑगस्‍टची मोफत चणाडाळ स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार यांच्‍याकडुन पढील कालावधीत उचल करावी. मागील दोन महिन्‍याची 2 किलो दाळ लवकरच उपलब्‍ध करून देण्‍यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

           मोफत चणाडाळ वाटप करतांना ई-पास द्वारे मिळालेली पावती ग्राहकांना देणे अनिवार्य आहे. पात्र लाभार्थ्‍यांनी कोविड-19 च्‍या पार्श्‍वभुमीवर रास्तभाव दुकानामध्‍ये गर्दी न करता प्रत्‍येक ग्राहकांमध्‍ये 1 मीटर अंतर ठेवुन तोंडाला मास्‍क लावुन सामाजिक आंतरपथ्याचे चे पालन करुन प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेअंतर्गत राज्‍यातील अंत्‍योदय अन्‍न योजना व प्राधान्‍य कुटुंबातील लाभार्थ्‍यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात यावे.

            अशाप्रकारे प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेअंतर्गत राज्‍यातील अंत्‍योदय अन्‍न योजना व प्राधान्‍य कुटुंबातील लाभार्थ्‍यांना लक्ष्‍य निर्धारित सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत जूलै ते सप्‍टेंबर 2020 या कालावधीकरीता प्रति शिधापत्रिका प्रति महिना एक किलो प्रमाणे एकुण तीन किलो चणाडाळ मोफत वितरीत करण्‍यात येणार आहे. तथापि, सद्यस्थितीमध्‍ये एका महिन्‍याची मोफत चणाडाळ घ्‍यावी व त्‍याच महिन्‍यासाठी ई-पॉस मशिनवर अंगठा देणेत यावा व पावती घेणेत यावी. पुढील दोन महिन्‍याची चणाडाळ उपलब्‍ध करून देण्‍यात आलेनंतर त्‍यानुसार ई-पास मशिनवर अंगठा देणेत येवुन पुढील महिन्‍याची मोफत चणाडाळ लाभार्थ्‍यांनी घेणेत यावी. त्‍यानुसार लाभार्थ्‍यांना सदर योजनेचा लाभ मिळणार असून सर्व लाभार्थी यांनी त्‍याचा लाभ घ्‍यावा,असे आवाहन त्यांनी केले आहे.  

Post a Comment

0 Comments