नगरकरांनी लुटला खंडग्रास सूर्यग्रहणाचा आनंद










नगरकरांनी लुटला खंडग्रास सूर्यग्रहणाचा आनंद

नगर - यंदाच्या वर्षाच  सर्वात मोठ्ठ सूर्य ग्रहण आज पार पडलं संबंध देशभरात काही ठिकाणी खंडग्रास तर काही ठिकाणी कंकणाकृती सूर्यग्रहणाचा खगोलीय अविष्कार सुमारे ३ ते ५ तास दिसला आज विरळ ढगाळ वातावरण असल्याने सूर्याचा ढगांआडून लपंडाव सुरु होता त्यामुळे काहीसे विरळ पण सूर्यबिंब पाहता आल्याने खगोल प्रेमींनी हा अविष्कार बघण्याचा आनंद लुटला. इमारतींच्या छतांवर जमून अनेकांनी एक्स-रे च्या फिल्म, गॉगल्स , वेल्डिंगच्या काचा आदींच्या सहाय्याने सूर्य ग्रहण पहिले अनेक खगोल प्रेमींनी ग्रहण काळामध्ये वातावरणात होणारे बदल पक्ष्यांच्या हालचाली आदींशी टिपण्या
नोंदविल्या.

नगर शहरात सकाळी १०.१ मिनीटांनी ग्रहणाला सुरवात झाली. सूर्यबिंबाला चंद्र छायेचा स्पर्श झाला त्याबरोबर चंद्र कले प्रमाणे सूर्यबिंब चंद्र छायेने ग्रासून सूर्यबिंब दशमीच्या चंद्राकोरीप्रमाणे दिसू लागले ११.२७ वाजता ग्रहणाचा मध्य आणि त्यानंतर हळू हळू ग्रहण सुटू लागले ग्रहणाचा मोक्ष १.१८ मिनिटांनी झाला दरम्यानच्या काळामध्ये ढगां आड सूर्यबिंब जात असताना निळ्याशार आणि पिवळ्या रंगाच्या आभा निर्माण होत होत्या. काळे ढग आणि त्यात अधून मधून उमटणाऱ्या आभा असे विलोभनीय दृश्य आकाशात पाहायला मिळाले अनेकांना हे दृश्य आपल्या  मोबाईल मध्ये टिपण्याचा मोह आवरता आलानाही.

Post a Comment

0 Comments