जिल्ह्यातील धरणांत अभूतपूर्व साठा

जिल्ह्यातील धरणांत  अभूतपूर्व साठा 


पंचेचाळीस वर्षातील विक्रमी साठा 

वेब टीम नगर,०२  -  यंदा जून महिन्याच्या सुरवातीलाच जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या तिन्ही धरणांत पाणीसाठा बक्कळ असून जिल्ह्याच्या इतिहासात ४५ वर्षात प्रथमच इतका मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. यात भंडारदरा धरणात ३५.१८% (३८८४ द.ल.घ.फु ),मुळा धरण २८.६२% (७४४० द.ल.घ.फु) तर निळवंडे धरणात ४४.३३ % (३६८८ द.ल.घ.फु ) इतका साथ असल्याने यंदा प्रथमच जिल्ह्यातील टँकर्स ची संख्या रोडवल्याच पाहायला मिळतं.

गेल्या वर्षी झालेल्या विक्रमी पाऊसामुळे जिल्ह्यात आजचे समाधानकारक चित्र दिसत आहे गेल्यावर्षी जिल्ह्यात सर्वत्र विक्रमी पावसाची नोंद झाल्याने परिसरातील  नद्या,नाले,ओढे गेल्या काही महिन्यांपर्यंत खळखळून वाहताना दिसले.तलाव,विहिरीही  तुडुंब भरल्याच चित्र पाहायला मिळालं पाण्याची भू अंतर्गत पातळीतही  सुधारणा दिसली त्यामुळे जिल्ह्यातील आठ माध्यम व लघु पाट बंधाऱ्यात पाण्याची चांगली आवक झाली . गेल्या वर्षी च्या तुलनेत मुलं धारण वगळता आठही प्रकल्पांमध्ये  ३ ते ५ पटीने वाढ दिसली गेल्या वर्षी आजच्या तारखेला भंडारदरा धरणात ६.५६ % पाणीसाठा होता तर या वर्षी ३५.१८ % इतका आहे अन्य प्रकल्पांमध्येही पाणी साठ्यात लक्षणीय वाढ दिसत आहे मुळा धारण गेल्या वर्षी २०.३७ % तर या वर्षी २८.६२ % ,  निळवंडे धारण गेल्या वर्षी ११.६८ % तर या वर्षी ४४.३३%  , अढळा १३.५८%  तर या वर्षी ३८.९६% , मांडओहोळ धारण गेल्या वर्षी कोडे ठाक पडले होते तर यावर्षी २२.९६ % इतका साठा इतका आहे . हीच परिस्थिती घालशीळ  लघु प्रकल्पाच्या बाबतीतही असून गेल्या वर्षी कोरडे ठाक पडलेल्या या प्रकल्पात यंदा ४.५०% पाणीसाठा आहे, खैरी निमगाव लघु प्रकल्पात गेल्यावर्षी पाण्याने तळ गाठला होता त्यावेळी २.७३% इतका जलसाठा होता तर यावर्षी ७.५०% , तर सीना लघु प्रकल्पात गेल्यावर्षी ६.३८% इतकाब साठा  होता एन्डस त्यात वाढ होऊन २०.२१% इतका साथ आजमितीला शिल्लक आहे.

यंदा मान्सूनचे भाकीत वर्तवताना वेधशाळेने सरा सरी इतका म्हणजेच समाधानकारक पाऊस होणार असल्याचे भाकीत वर्तवलेले असताना यंदा मान्सूनची   सुरवात एक आठवडा लवकर झाली असून समाधानकारक पाऊस होणार असल्यास पाण्याचे नियोजन आत्तापासूनच करणे गरजेचे झालेले आहे .

*चौकट *
गेल्या ४५ वर्षाच्या इतिहासात प्रथमच सर्व प्रकल्पांमध्ये मुबलक अथवा समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे एकंदरीत जिल्ह्यातील पर्जन्यमनाच्या इतिहास दर ३ वर्षांनी अवर्षणग्रस्त परिस्थिती ओढवते असे चित्र गेल्या १०० वर्षाच्या आकडेवारीचा अभ्यास करता आढळून आली आहे. 

Post a Comment

0 Comments