आता मोबाईलद्वारे करता येणार पीक कर्जासाठी अर्ज

 आता  मोबाईलद्वारे करता येणार पीक कर्जासाठी अर्ज

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची संकल्पना

वेब टीम नगर दि. 11 - कोरोना संकटाच्या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या खरीप हंगामात पीक कर्ज  वेळेवर मिळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र अर्थात एनआयसीने शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वरून्ही अर्ज करता येणार आहे.
पीक कर्जासाठी ऑन लाइन अर्ज करताना मोबाईलवर https://ahmednagar.nic.in/notice/application-for-crop-loan-2020-21-ahmednagar-district/ लिंक वर जाऊन शेतकरी पीक कर्जासाठी अर्ज करू शकतात. कोरोना संकटाच्या काळात दैनंदिन व्यवहारावर तसेच मनुष्यबळ कमतरते मुळे बँकांच्या कामकाजावरही परिणाम झाला. मात्र, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांना वेळेवर पीक कर्ज मिळाले तर त्यांना या हंगामासाठी त्याचा योग्य उपयोग करता येईल, हे जाणून जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी एनआयसीला अशा प्रकारे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यास सांगितले होते. त्यानुसार, अर्जासाठी आवश्यक माहिती या लींकमध्ये भरून शेतकरी देऊ शकतात. त्यानंतर त्या अर्जावर बँक निर्णय घेणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळ आणि पैशाची बचत होणार असून कोरोना संकटाच्या काळात बँकेसमोर रांगा लावण्याचीही गरज राहणार नाही.
 सर्व शेतकरी बांधवांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अग्रणी प्रबंधक संदीप वालावलकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments