कोविड -१९ साठी प्रतिबंधात्मक होमिओपॅथिक औषधे महापौरांकडे सुपूर्द
वेब टीम नगर,दि.१८ - आयुष्य मंत्रालय नवी दिल्लीने केंद्रीय होमिओपॅथिक औषध प्रतिबंधात्मक आणि प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सुचविण्यात आलेले अर्सेनिक ए.एल.बी ३० हे औषध काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक मेडिकल फाऊंडेशन च्या वतीने महापौरांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे म.न.पा चे आयुक्त श्रीकांत मायकलवार, आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे , अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख सुरेश इथापे , महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी चे उपाध्यक्ष डॉ.अजित फुंदे,काकासाहेब म्हस्के मेडिकल कॉलेज चे विश्वस्थ डॉ.जयंत शिंदे , काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. विवेक रेगे आदी उपस्थित होते.
हे होमिओपॅथिक औषध म.न.पा तील सर्व अधिकारी,कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी देण्याची विनंतीही यावेळी करण्यात आली. या औषधाच्या चार गोळ्या रोज सकाळी एकदा उपाशी पोटी ३ दिवस चघळून घेतल्याने कोविड -१९ च्या प्रादुर्भावाची शक्यता कमी होते,हे औषध शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते मात्र या गोळ्या घेतल्या नंतरही सोशल डिस्टंसिंग पाळणे , मास्क वापरणे आणि कोविड -१९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आयुष्य मंत्रालयाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे डॉ.अजित फुंदे , डॉ. जयंत शिंदे आणि डॉ. विवेक रेगे यांनी सांगितले.
या औषधांबद्दल म.न.पा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी आभार मानले तर कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी अत्यंत उपयोगी पडतील अशी अपेक्षा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी व्यक्त केली.
फोटो ओळी : - कोविड -१९ च्या प्रतिबंधासाठी आयुष्यमंत्रलयाने सुचविलेले होमिओपॅथिक औषध म.न.पा महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक महाविद्यालयाने सुपूर्द केले यावेळी म.न.पा आयुक्त श्रीकांत मायकलवार, आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे , अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या कडे देताना काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी महाविद्यलयाचे विश्वस्थ डॉ. जयंत शिंदे महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे उपाध्यक्ष डॉ. अजित फुंदे , प्राचार्य डॉ. विवेक रेगे.
0 Comments