बीपीसीएल मार्फत घरपोहोच एलपीजी गॅस वितरण


बीपीसीएल मार्फत घरपोहोच एलपीजी गॅस वितरण

          वेब टीम नगर दि.४ – जिल्‍हयातील बीपीसीएल  धारकांना पुरविण्‍यात येणारे एलपीजीची  कमतरता नसून सिलेंडर्स घराघरात पोचले जातील.  आपल्‍या घरात सुरक्षित राहण्‍यासाठी  जिल्‍हयातील सर्व केंद्र आणि वितरकामार्फत नेटवर्कच्‍या सहार्याने ग्राहकांना ही सुविधा पुरविण्‍यात येणार असल्‍याची माहिती भारत पेट्रोलियम कॉपोरेशन लिमिटेडचे विक्री प्रबंधक चंद्र प्रताप सिंह राजावत यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

            रोख हाताळणी टाळण्यासाठी त्यांना ऑनलाईन बुकिंग करणे आणि ऑनलाईन पैसे भरणे आवश्यक आहे. या लॉक डाऊन कालावधीत सर्व ग्राहकांना विनाव्यत्यय एलपीजी सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी आमचे वितरक कर्मचारी, गोदाम किपर, मेकॅनिक्स आणि डिलिव्हरी मुले पूर्ण तयारीत आहेत. केंद्र  सरकारने एप्रिल ते जून २०२० या कालावधीत सर्व उज्ज्वला ग्राहकांना विनामूल्य एलपीजी जाहीर केले. या रिफाईल्सची किंमत उज्ज्वला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आगाऊ हस्तांतरित केली जाईल जेणेकरुन ते वापरु शकतील. या योजनेंतर्गत३ लाख ३ हजार ८०५  जिल्ह्यातील उज्ज्वला लाभार्थीस लाभ होणार आहे असे  त्‍यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments