दिव्‍यांगासाठी जिल्‍हास्‍तरीय कोरोना सहाय्य दिव्‍यांग कक्षाची स्‍थापना

दिव्‍यांगासाठी जिल्‍हास्‍तरीय कोरोना सहाय्य दिव्‍यांग कक्षाची स्‍थापना


         वेब टीम नगर दि.०२ – केंद्र शासनाच्‍या सामाजिक न्‍याय व अधिकारिता मंत्रालय, दिव्‍यांगजन सशक्‍तीकरण विभाग, नवी दिल्‍ली यांनी कोरोना विषाणू प्रादुर्भाव कालावधीत दिव्‍यांग व्‍यक्‍तींच्‍या संरक्षण आणि सुरक्षेसाठी  व  मार्गदर्शक सूचनांचे  जिल्‍हास्‍तरावर अंमलबजावणी  करण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरीय कोरोना सहाय्य दिव्‍यांग कक्ष जानकीबाई आपटे  मुकबधीर विद्यालय, टिळक रोड, अहमदनगर येथे स्‍थापन करण्‍यात आला असून त्यासाठी अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती नोडल अधिकारी, जिल्‍हास्‍तरीय करोना सहाय्य दिव्‍यांग कक्ष तथा जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी नितीन उबाळे यांनी दिली आहे. 

            जिल्‍हास्‍तरीय कोरोना सहाय्य दिव्‍यांग कक्षाचे कामकाज हे जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालय, टिळकरोड अहमदनगर येथून चालेल. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मुख्‍याध्‍यापक व विशेष शिक्षकांचे  संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे –  विजय मुरलीधर आरोटे, मुख्‍याध्‍यापक मो.९३२५१०१९९४ व विशेष शिक्षक सहदेव मधुकर कर्पे मो.९८६०३०९१८७ (जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालय)

स्‍नेहा प्रमोद महाजन, मुख्‍याध्‍यापिका मो. ९८५०९०१७०९ विशेष शिक्षक योगेश विठ्ठल अल्‍हाट मो. ९६८९५२४६८२ (मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा), भाऊसाहेब लक्ष्‍मण कदम, निदेशक मो. ७०२०६९४२१८ (ज्‍योत्‍स्‍ना उद्योग केंद्र  सोसायटीची कार्यशाळा) आणि सावेडी येथील मुकबधीर मुलांची शाळेचे  विशेष शिक्षक  दिलीप कृष्‍णा जगधने मो. ९९७५५०१४६८. 

            दिव्‍यांग व्‍यक्‍तीनी कारोना विषाणू विषयी काही अडचणी असल्‍यास  जिल्‍हास्‍तरीय  करोना सहाय्य दिव्‍यांग कक्ष जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालय टिळक रोड अहमदनगर येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यत  संपर्क साधावा.
                                 
                                                                           ****                                                                     

                 दिव्‍यांगासाठी तालुकास्‍तरीय नोडल अधिका-यांचे संपर्क क्रमांक  

          वेब टीम नगर दि. ०२ – केंद्र शासनाच्‍या सामाजिक न्‍याय व अधिकारिता मंत्रालय, दिव्‍यांगजन सशक्‍तीकरण विभागाने कोरोना विषाणू पासून दिव्‍यांग व्‍यक्‍तींच्‍या संरक्षण आणि सुरक्षेसाठी  व  मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्‍यासाठी तालुकास्‍तरीय नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.          तालुका व ग्रामस्‍तरावर दिव्‍यांग व्‍यक्‍तींना जीवनावश्‍यक वस्‍तूंचे कीट, आरोग्‍यासाठी  आवश्‍यक साहित्‍य, कम्‍युनिटी किचन याबाबतच्‍या वस्‍तू व सुविधा  उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी तसेच  दिव्‍यांग व्‍यक्‍तीची करोना विषाणू च्‍या अनुषंगाने गरज भासल्‍यास  तातडीने शासकीय रुग्‍णालयामार्फत वैद्यकीय तपासणी  करण्‍यासाठी तालुकास्‍तरावर नोडल अधिकारी यांचेशी संपर्क साधावा त्‍यांचे संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.

            अकोले पंचायत समितीचे प्र. सहायक गट विकास अधिकारी सचिन देवीदास कोष्‍टी (मो. ८१४९२१४०६८  दूरध्‍वनी क्र. ०२४२४-२२१२३०), संगमनेर -पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी हिरामण शेळके  (मो. ९५११८७९८१५  दूरध्‍वनी क्र. ०२४२५-२२५२४८), कोपरगाव- प्र. सहायक गट विकास अधिकारी  दिलीप सोनकुसळे (मो. ७५७६५९५३१४ दूरध्‍वनी क्र. ०२४२३-२२२३४४), राहाताश्- प्र. सहायक गटविकास अधिकारी श्री ठाकूर (मो. ९४२३४६६८६०/८४८४०३५८९५  दूरध्‍वनी क्र.०२४२३-२४३९५५),  श्रीरामपूर - प्र. सहायक गटविकास अधिकारी  कडलग ई. ओ. (मो.९४२१९८२८३०  दूरध्‍वनी क्र. ०२४८७-२२२३२९), राहुरी - सहायक गटविकास अधिकारी  अनंत परदेशी (मो.९०११७९४२१४ दूरध्‍वनी क्र. ०२४२६-२३२४३२), नेवासा - गटविकास अधिकारी शेखर शेलार (मो.९५४५३२५१११  दूरध्‍वनी क्र. ०२४२७-२४१२३१), शेवगाव - सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार (मो.७७७४०४७९७९ दूरध्‍वनी क्र. ०२४२९-२२१२५२), पाथर्डी -  सहायक गटविकास अधिकारी  दादासाहेब भाऊसाहेब शेळके (मो. ७५८८६९६८१८ दूरध्‍वनी क्र. ०२४२८-२२२३६२), जामखेड - गटविकास अधिकारी पी. पी. कोकणी  (मो. ९४२२९६१६०५ दूरध्‍वनी क्र. ०२४२१-२२१०३५), कर्जत - गट विकास अधिकारी  परमेश्‍वर सुद्रिक ( मो. ९४२२२३१०५०  दूरध्‍वनी क्र. ०२४८९-२२२३२५), श्रीगोंदा - सहायक गटविकास अधिकारी रामकृष्‍ण जगताप (मो. ९४२१८४७५२० दूरध्‍वनी क्र. ०२४८७-२२२३२९), पारनेर - गटविकास अधिकारी श्री साळवे ( मो.८२७५४५२५३७  दूरध्‍वनी क्र.०२४८८-२२१५२४) आणि नगर पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी  ए. ओ.जगताप  (मो. ९४२३४६५५९० दूरध्‍वनी क्र.०२४१-२३४५४२९ )असे आहेत.

            नोडल अधिकारी यांनी केंद्र शासनाच्‍या सामाजिक  न्‍याय व अधिकरीता मंत्रालय दिव्‍यांगजन सशक्‍तीकरण विभाग नवी दिल्‍ली यांनी निर्गमित केलेल्‍या कोरोना विषाणूपासून दिव्‍यांग व्‍यक्‍तींच्‍या संरक्षण आणि सुरक्षासाठी आपल्‍यास्‍तरावरुन  कार्यवाही करावी व नोडल अधिकारी यांना सूचना निर्गमित करण्‍यात यावीत, असे श्री. उबाळे यांनी प्रसिध्‍दी पत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

0 Comments