मुकुंदनगर मध्ये पोलिसांचे धाडसत्र


मुकुंदनगर मध्ये पोलिसांचे धाडसत्र 

वेब टीम  नगर,दि.३० -  एकीकडे कोरोना व्हायरसला नेस्तनाबूत करण्याचे आटोकाट प्रयत्न सुरु असताना काल म्हणजे दि. २९ रोजी मुकुंदनगर परिसरात काही नवीन रुग्ण सापडल्याने नगरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यावर उपाय योजना म्हणून पोलीस प्रशासनाने हा परिसर सील केला आहे.मुकुंदनगर परिसरात काही रुग्ण असल्याच्या तक्रारी परिसरातून आल्यानंतर मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी आरोग्य सेविका पथकाला आणि दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करून माहिती दिल्यानंतर या पथकांनी मुकुंद नगर परिसरात काही ठिकाणी धाडी टाकल्या व संशयित रुग्णांचे रक्त व घश्यातील स्रावाचे नमुने घेतले. दुपार नंतर उशिरा पर्यंत हि कारवाई चालू होती. यासांदरबत अधिक चौकशी करता म . न. पा चे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याशी साधण्याचा प्रयत्न केला मात्र ते उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे या परिसरातील कोरोना बाधित संशयितांचा निश्चित आकडा मिळू शकला नाही. 

Post a Comment

0 Comments