वि.हि.प - मठ मंदिर संपर्क समितीच्या वतीने मास्क वाटप

वि.हि.प - मठ मंदिर संपर्क समितीच्या वतीने मास्क वाटप 


वेब टीम नगर, दि.२८ - कोरोना विषाणूच्या प्रभावाला कमी करण्यासाठी अनेक सामाजिक संघटनांकडून आवश्यक त्या उपाय योजना केल्या जात असून अनेक संघटना हिरीरीने आपला खारीचा वाटा उचलत आहेत. आज वि.हि.प आणि मठ मंदिर संपर्क समितीच्या वतीने तोफखाना पोलीस ठाणे आणि कोतवाली प्लॉस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना कापडी मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच गरजू नागरिकांनाही ५०० मास्क वाटण्यात आले .

यावेळी मठ मंदिर संपर्क समितीचे अध्यक्ष हरीभाऊ डोळसे , वि.हि.प चे जिल्हा मंत्री गजानन सोनावणे , धर्म प्रसारक प्रमुख अनिल देवराव, मेडिया प्रमुख अमोल भांबरकर , पत्रकार संजय सावंत , बजरंग दल प्रमुख गौतम कराळे , राजेंद्र चुंबळकर आदी . उपस्थित होते

पत्रकाराची सहृदयता
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी देशभरातील लॉकडाउनच्या आज चौथ्या दिवशी जुन्या पिढीतील पत्रकार प्रकाश भंडारे  यांनी रस्त्यात अडकून पडलेल्यांना जवळपास १० डजन केळींचे वाटप करून त्यांची क्षुधा भागवण्याचा प्रयत्न केला. तर एका व्यक्तीला १०० रुपयांची आर्थिक मदतही केली.एरवी पत्रकारांच्या वागण्यावरून अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया येत असतात मात्र वरील प्रसंगातुन एका पत्रकाराची सहृदयताही दिसली.

Post a Comment

0 Comments