"नगरटुडे"च्या बातमीचा परिणाम

"नगरटुडे"च्या बातमीचा परिणाम 

वेब टीम नगर,दि.२७- आजच "नगरटुडे" ने प्रसिद्ध केलेल्या "अन म्हणे ..... टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त करा" या मथळ्या खाली आरोग्य सेविकांची कैफियत मांडली. या बातमीतील कैफियत वाचुन  जिल्हा प्रशासनाने आरोग्य सेवेसंदर्भात काम करणाऱ्यांना भाडे तत्त्वावरील मालमत्ता रिक्त करायला लावणाऱ्यावर  कारवाईचे आदेश  जिल्हा प्रशासनाने दिले असून अवघ्या काही तासात आरोग्य सेविकांना न्याय मिळाला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

आरोग्य सेवेसंदर्भात काम करणार्‍यांनाभाडे तत्वावरील मालमत्ता रिक्त करायला लावल्यास कारवाई

            जिल्ह्यातील वैद्यकिय व्यवसायीक, नर्सींग व पॅरामेडीकल स्टाफ, आरोग्य सेवेशी संबंधीत व्यक्ती यांनी त्यांच्या आरोग्य सेवेसंबंधी व्यवसायाकरीता भाडे तत्वावर घेतलेल्या रहिवासी /वाणिज्य मालमत्ता रिक्त करण्यासाठी अशा मालमत्तांचे मालक दबाव आणत असतील, तर अशा खाजगी मालमत्ता मालकाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता १८६० कलम  २७० च्या तरतुदीनुसार दंडनिय कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.

            कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व खासगी दवाखाने, रुग्णालये सुरु ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. अशावेळी आरोग्य सेवेसाठी काम करणार्‍या वैद्यकीय व्यावसायिक, नर्सींग व पॅरामेडीकल स्टाफ अशा व्यक्तींना मालमत्ता रिक्त करण्याच्या कारणामुळे आपत्ती काळात वैद्यकीय सेवेवर ताण येऊ शकतो, त्यामुळे अशा तक्रारी आल्यास संबंधित मालमत्ता मालकांविरुद्ध महानगरपालिका आयुक्त, उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकारी यांनी कार्यवाही करण्यासंदर्भात या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.       

Post a Comment

0 Comments