बन्सीमहाराज मिठाई सामाजिक बांधिलकीत अग्रेसर

बन्सीमहाराज  मिठाई सामाजिक बांधिलकीत अग्रेसर  



पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके- गुढीपाडव्या निमित्त संजय नगर झोपडपट्टीत मिठाई वाटप

वेब टीम नगर,दि.२७ - कोरोनाच सावंत घोंगावत असताना पूर्ण देश त्याच्या प्रतिबंधासाठी अख्खा देश लॉकडाउन करण्यात आला त्यामुळे गुढी पाडवा सण कोरोना च्या सावटाखाली अनेक ठिकाणी नीटसा साजरा होऊ शकला नाही कुठे गोड धोडाची वानवा तर कुठे आर्थिक कमतरता अश्या स्थितीत लोकांनी गुढीपाडवा साजरा केला तर शहरातील झोपडपट्टीतून याहीपेक्षा दारुण स्थिती होती मात्र शहरातील बन्सीमहाराज मिठाई हि आस्थापना शंभरीच्या उंबरठ्यावर असून या आस्थापनाने सामाजैक बांधिलकी जपत संजय नगर झोपडपट्टीत ३०,००० गुलाबजामून आणि ५०० बुंदीच्या लाडूंचे वाटप केले. यावेळी शहराचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या उपस्थितीत या खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात आले.


बन्सी महाराज मिठाई हि आस्थापना सामाजिक कार्यात अग्रेसर असून अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो.  यापुढील काळातील सणासुदीच्या दिवसातही  बन्सीमहाराजच्या वतीने असाच सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे असे संदीप मिटके यांनी सांगितले.
 बन्सी महाराज मिठाईचे संचालक राजकुमार जोशी यांनी देवाच्या कृपेने आणि नगरकरांच्या प्रेमामुळे बन्सी महाराज ने शंभरी गाठली त्यामुळे जनतेच्या सुख दुःखात सहभागी म्हणून यात आम्ही धन्यता मानतो यापुढील सणासुदीच्या दिवसातही असेच उपक्रम राबविले जातील अशी ग्वाही राजकुमार जोशी यांनी दिली .

दंगल नियंत्रण पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचे या उपक्रमास सहकार्य लाभले.    

Post a Comment

0 Comments