वातावरण शुद्धीचा उपाय अग्निहोत्र

अग्नीहोत्राने  वातावरणातील प्रदुषण कमी करणे शक्य 



वेब टीम नगर,दि.२१ -पंतप्रधानांनी आवाहन केल्या प्रमाणे २२मार्च रोजी एकदिवसाचा जनता कर्फ्यू पाळून जनतेने सहकार्य केले. आता आणखीन २१ दिवसांसाठी देश लॉक डाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे आता कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी रोज नित्यनेमाने अग्नीहोत्र करावे त्यामुळे हवेतील होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल असे आवाहन योगविद्या धाम च्या शोभना वाळिंबे , लक्ष्मण कुवळेकर आणि प्रकाश भंडारे यांनी केले आहे.
सध्याच्या करोना  बाधित वातावरणाला शुद्ध करण्याची शक्ती अग्निहोत्रात असून सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या  वेळी केल्या जाणाऱ्या अग्निहोत्राने वातावरण २४ तास शुद्ध राहते असे सांगताना लक्ष्मण कुवळेकर यांनीं जगभरात सध्या लॉक डाऊन असून या देशातील प्रदूषण कमी झाल्याने वातावरण शुद्ध झाल्याची छायाचित्रे नासाने नुक्तीच प्रदर्शित केली असून जगभरात त्याचे परिणाम दिसून येत आहेत मात्र हि स्थिती कायम स्वरूपी राहणारी हि सगळी प्रक्रिया पुन्हा पुन्हा करण्याची गरज आहे मात्र पुन्हा पुन्हा असे करणे या जगाला परवडणारे नाही त्यामुळे रोज दोन वेळा अग्निहोत्र करणे अवघ्या जगाच्या दृष्टीने  हितकर राहील असेही कुवळेकर यांनी सांगितले.
अग्निहोत्राचे मूळ पीठ अक्कलकोट इथे असून येथून जगभरातील केंद्र चालविली जातात सध्या करोनाचा विषाणू जगभरात धुमाकूळ घालत असून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अग्निहोत्र हाच रामबाण उपाय आहे . प्रातःकाळी आणि सायंकाळी अग्निहोत्रामध्ये दिल्या जाणाऱ्या आहुती ने वातावरण शुद्ध होते. अग्निहोत्र करीता  गोवंशाच्या गोवऱ्या ,गाईचे तूप ,दोन चिमूट अख्खा तांदूळ ,काजळी रहित अग्निपात्र आणि आहुतीचे दोन मंत्र इतक्या कमी  सामग्रीत हि क्रिया करता येत असल्याने ती जगभरातल्या लोकांसाठी अत्यंत साधी करायला सोपी आणि कल्याण करी ठरेल असे मत नगर च्या योग्य विद्या धाम च्या संचालिका शोभना वाळिंबे यांनी सांगितले यावेळी प्रकाश भंडारे यांनी अग्निहोत्र करण्याचे फायदे हे वैज्ञानिकांनी केलेल्या प्रयोगातून सिद्ध झाले आहेत त्याचा वापर देशातील जास्तीत जास्त नागरीकांनी करावा असे आवाहन केले आहे.



Post a Comment

0 Comments