पहिले करोनाग्रस्त रुग्ण सुखरुप घरी रवाना


पहिले करोनाग्रस्त रुग्ण सुखरुप घरी रवाना

वेब टीम पुणे ,दि. २५ - महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला आज  रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयातून त्यांना ॲम्ब्युलन्समधून घरी सोडण्यात येईल. कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने हे दाम्पत्य आता ठणठणीत होऊन आज म्हणजेच गुढीपाडव्याला आपल्या घरी परतणार आहे.
पुण्यातील हे दाम्पत्य महाराष्ट्रातील पहिले कोविड-१९ चे रुग्ण होते. दुबईहून परतलेल्या या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर होळीच्या दिवशी ते नायडू रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले. चौदा दिवसांनी त्यांची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर दोन-तीन दिवसांनी त्यांचे नमुने पुन्हा एकदा घेण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात येत आहे.
 पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याची टेस्ट निगेटिव्ह
दरम्यान या दाम्पत्याच्या संपर्कात आल्याने त्यांची मुलगी तसंच त्यांना मुंबईहून पुण्याला सोडणाऱ्या ओला कॅब चालकालाही कोरोनाची लागण झाली होती. दोघांवरही उपचार सुरु आहेत. दाम्पत्याच्या मुलीच्या पहिल्या चाचणीचे नमुने आज तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. तर चालकाच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल यायचा आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्याची पहिली चाचणी निगेटिव्ह आली आहे.त्यामुळे आज गुडीपाडव्याच्या दिवशी त्यांना घरी सोडण्यात आलं .
पोलिसांची त्यांना घरी सोडण्यास टाळाटाळ 
या दाम्पत्याला घरापर्यंत सोडण्यात यावे तसेच त्यांच्या वसाहतीत त्यांना विरोध होऊ नये म्हणून तेथे पोलीस असणे गरजेचे आहे मात्र पोलीस त्यांच्याबरोबर जाण्यास तयार नसल्याचे निदर्शनास आल्या नंतर प्रसारमाध्यमातून या बातमीला प्रसिद्धी मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना सिहंगड रस्त्यावरील त्यांच्या घरापर्यंत सोडले .  

Post a Comment

0 Comments