शुक्रवार बाजारला कुलूप , भिंगार काँग्रेसने प्रश्‍न मांडला


शुक्रवार बाजारला कुलूप , भिंगार काँग्रेसने प्रश्‍न मांडला

वेब टीम नगर ,दि. २३- जीवनाश्यक वस्तूंमध्ये फळ व भाजीचा समावेश असल्याने भिंगारमध्ये फळ-भाजीचा समावेश असल्याने भिंगारमध्ये फळ-भाजी विक्रीची व्यवस्थेला मनाई करू नये, अशी सूचना कॅन्टोन्मेंट बोर्ड व  पोलिस प्रशासनाला करू, असे आश्‍वासन निवासी उपजिल्हाधिकारी सागर पाटील यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिली.
काँग्रेसचे  भिंगार अध्यक्ष व कॅन्मोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. आर. आर. पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आरडीसी  पाटील यांना भेटले. त्यावेळी त्यांनी वरील आश्‍वासन दिले. भिंगारच्या प्रख्यात शुक्रवार बाजारतळाला चारी बाजूने कुलूप लावून फळ-भाजी विक्रेत्यांना विक्री करण्यास मनाई करण्यात आली. याबाबत काँग्रेसचे शिष्टमंडळ  पाटील यांना तातडीने भेटले. कॅन्टो. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निरीक्षक प्रविण पाटील यांनी ही कारवाई केल्याचे  शाम वाघस्कर यांनी आरडीसीसमोर निर्देशनास आणले.
भिंगार शहरात फळ, भाजी विक्री यांना पूर्णपणे मनाई केल्याने विक्रेते आणि भिंगार करांची मोठी अडचण असल्याचे निजाम पठाण यांनी म्हटले. परिस्थितीचे गांभिर्य  पाटील यांच्यासमोर शिष्टमंडळाने स्पष्ट केले. यावर मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले.
वास्तविक बाजारतळावर बसणार्‍या फळ-भाजी विक्रेत्यांकडून कॅन्टो. बोर्डचा ठेकेदार वाजवी दर असताना जादा दराने पैसे वसूल करतात. २० रुपया ऐवजी ५० रुपये भाजी विक्रेत्यांकडून घेतात. परवा५० रुपये दिल्यानंतरही कारवाई झाली. त्यामुळे२-४ दिवसांपासून फळ-भाजी विक्रीला लगाम बसला. परिणामी भिंगारकरांना भाजी मिळाली नाही आणि विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले, असे शिष्टमंडळाने यावेळी सांगितले. कॅन्टो. अधिकारी आणि पोलिस प्रशासनाने ही कारवाई केली. पोलिसांनी काही भाजी विक्रेत्यांना मारहाणही केल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
भिंगारमध्ये फळ-भाजी विक्री करण्यास मनाई असेल तर ही मनाई रद्द करावी, अशी सूचना संबंधितांना देऊ मात्र, भाजी विक्री-खरेदी प्रसंगी गर्दी होणार नाही. १४४ कलम भंग पावणार नाही याची दक्षता विक्री करणार्‍यांनी ही घ्यावी, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. या शिष्टमंडळात अ‍ॅड. पिल्ले,  वाघस्कर, निजाम पठाण, संतोष धिवर, विवेक येवले आदि पदाधिकारी सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments