अभूतपूर्व बंद .....

अभूतपूर्व बंद ..... वेब टीम नगर, दि.२२ - सर्वत्र निरव शांतता सुनसान  रस्ते , निर्मनुष्य झालेली गर्दीची ठिकाणे ,  रस्त्याच्या एका टोकाला उभं राहून हाक मारली तर दुसऱ्या टोकाला ऐकू येईल असे वातावरंण , मधूनच सायरन वाजवत जाणारी  पोलिसांची गाडी , अश्या वातावरणातच आज नागरकरांची सकाळ सुरु झाली आणि असाच वातावरण दिवसभर कायम राहिलं.

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी  जनता कर्फ्यूच आवाहन केलं होतं. त्याला शहरातील नव्हे जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . कोरोना विषाणूशी सुरु असलेल्या लढाईत आज नगरकरांनी  दिलेलं निर्णायक उत्तर होतं.


काल  पासूनच या बंदची नागरिकांनी जोरदार तयारी केली होती आजच्या दिवसभरासाठी लागणाऱ्या वस्तूंचा साठा कालच नगरकरांनी केला होता. कोणी शाकाहारी तर कोणी मांसाहारी मेजवानीचा बेत आखला होता तर अनेकांनी घर बसल्या टीव्ही वरील निरनिराळ्या चॅनेल्सवर चित्रपट पाहणे , अन्य मालिका पाहणे पसंद केले. महिला मंडळांनी वळणाच्या कामाला वेग दिला .

शहरात फेर फटका मारला असता शहरातील मोक्याच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते सुनसान झाले होते .अगदी भिंगारवाला चौकातून सर्जेपुराचे  दक्षिण मुखी मारुती मंदिर देखील  स्पष्ट दिसत होते , अशीच परिस्थिती तेली खुंट ते नेटसुभाष चौक , चितळे रॉड ते चौपाटी कारंजा , चौपाटी कारंजा ते नीलक्रांती चौक पर्यंतची दृश्य दिसत होती . दुपारच्या नंतर शहरात चिटपाखरूही दिसत नव्हते. जिल्हा प्रशासन , पोलीस प्रशासन
आणि मनपा चे प्रशासन देखील शहरात फेर फटका मारून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत होते.


एकंदरीतच आज आगर शहरामध्ये अभूतपूर्व बंद पाहायला मिळाला दरम्यान येते दोन आठवडे महत्वाचे असून करोनाचा धोका वाढू नये म्हणून शक्य असेल तेथे वर्क फ्रॉम होम या पद्धतीनेच काम करावे , संपर्क टाळण्याचा जास्तीत जास्त टाळावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.एस.टी  सेवा ठप्प 
* जिल्ह्यातील एस.टी  सेवा ठप्प जिल्ह्यातील कुठल्याच डेपोतून एस.टि  न धावल्याने वाहतूक पूर्ण पणे ठप्प झाली आता ३१ मार्च पर्यंत हीच परिस्थिती की कायम राहणार असल्याने पूर्व नियोजित प्रवास स्थगित करावा खाजगी वाहतूकही आज पूर्ण पाने बंद ठेवण्यात आली होती.


आदल्या दिवशीच दूध 
* आज सकाळी ७ वाजे पासूनच जनता  कर्फ्यू सुरु झाल्याने दूध टाकणाऱ्या गवळी अप्पांची मात्र मोठी त्रेधा उडाली , अनेक दुधवाल्यांनी कालच दुधाचे वाटप करून टाकले त्यामुळे आज सकाळी शहरात काहींनी दूध पिशवी मिळवण्यासाठी व्यर्थ वणवण केली.पोलीसही सुस्तावले 
* चौका चौकात तैनात केलेले पोलीस सकाळी उत्साहाने येणाऱ्या-जाणाऱ्यांना हटकत होते मात्र दुपार नंतर तेहि सुस्तावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

थाळीनादाने मानवंदना 
* सायंकाळी  ५ वाजता नागरिकांनी आपआपल्या घरांच्या सज्ज्यात, इमारतींमध्ये  उभे राहून  थाळीनाद ,टाळ्या वाजवणे , शंखनाद यातून ध्वनिनाद निर्माण करून आपत्कालीन स्थितीत काम करीत असलेल्या डॉक्टर्स , नर्सेस , पोलीस , आणि प्रशासनातील बांधवांना मानवंदना दिली.
Post a Comment

0 Comments