मनाला आनंद देणारे सामाजिक उपक्रम महत्वाचे
वेब टीम नगर, दि.१६ - नगरमध्ये अनेक सामाजिक संस्था आहेत या संस्थेच्या माध्यमातून शेकडो गोर-गरीब व गरजूंना नवजीवन देऊन आधार दिला जातो. वाढदिवस साजरा करतांना अशा घटकांना बरोबर घेऊन आनंदात समावून घेण्यातच खरे समाधान आहे; अशा गरजूंमध्येच परमेश्वर वसलेला असतो. स्नेहालय सारखी संस्था अनेक वर्षांपासून उत्तम काम करत आहे. अशा चांगल्या संस्थेला अभिषेक कळमकर यांनी दिलेली मदत बहुमोल आहे. सत्कार समारंभापेक्षा मनाला आनंद देणारे असे सामाजिक उपक्रमच मला जास्त अपेक्षित आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.
माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावतीने उपनेते अनिल राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहालयमधील विद्यार्थ्यांना २५० किलो तांदूळ, खाऊ तसेच शिवजयंतीचे औचित्य साधून शिवचरित्र देण्यात आले. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गिरिष जाधव, जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे, स्नेहालयाचे गिरिष कुलकर्णी, मिस्टर निक, पारुनाथ ढोकळे, संजय आव्हाड, उद्योजक महेश गलांडे, उमेश भांबरकर, मनिष गुगळे, भिमराज कराळे, सहदेव पावले आदि उपस्थित होते.
प्रास्तविकात अभिषेक कळमकर म्हणाले, अनिल राठोड हे सर्वसामान्य नागरिकांचे नेते आहेत. आमदार असो किंवा नसो, नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात ते अहोरात्र तत्पर असतात. अशा चांगले काम करणारे व्यक्तीमत्व शतायुषी होवो, ही परमेश्वराकडे प्रार्थना ! वंचित घटकांना हक्काचे घर देणार्या सामाजिक संस्थांना मदतीचा हात देण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच कर्तव्याच्या भावनेतून चांगले काम करणार्या स्नेहालयाला उपनेते अनिल राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मदत केली आहे.
यावेळी दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे आदिंनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. स्नेहालयाचे प्रमुख गिरिष कुलकर्णी यांनी उपनेते अनिल राठोड यांच्या कार्याचे कौतुक करुन स्नेहालयाच्यावतीने ‘गरीब नवाज’ हे मानपत्र दिले.
0 Comments