वायकर वस्ती शाळेचा प्लास्टीकमुक्ती जागर अमेरिकेत

वायकर वस्ती शाळेचा प्लास्टीकमुक्ती जागर अमेरिकेत

  वेब टीम नगर,दि. १३  - जागतिक महिला दिनाच औचित्य साधत जि.प.प्राथमिक शाळा वायकरवस्ती ता.पाथर्डी येथे उपसभापती मनीषाताई वायकर यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचे तसेच शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांच्या प्रेरणेने व्हिडीओ कॉन्फरन्स चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ग्लोबलनगरी फाऊंडेशन अमेरिका यांच्यावतीने अमेरिकास्थित इंजि.रोहित काळे  यांच्या तांत्रिक उपस्थितीत उपसभापती मनीषाताई वायकर यांचे हस्ते सर्व महिलांना, मुलींना कापडी पिशव्या भेट देवून महिला दिनी सन्मान करत प्लास्टिक मुक्तीचा जागर केला.
     सुगीचे दिवस असूनही महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, घरातील महिला जागृत झाली की घर पुढे जाते अन पर्यायाने राष्ट्रही; यानुसार संवाद मायभूमीशी या कार्यक्रमाद्वारे रोहित काळे यांनी तब्बल दोन तास उपस्थित सर्व विद्यार्थी, माता-भगिनींना स्वच्छता, आरोग्य पर्यावरण अन सामाजिक बांधिलकी याबाबत अनौपचारिक गप्पाद्वारे मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील विद्यार्थी यांचेसह सर्वच महिलांनी मुलाखत व चर्चेद्वारे रोहित काळे यांच्याकडून अमेरिकेतील संस्कृती लोकजीवन, उद्योग-धंदे पर्यटन, स्वच्छता, पर्यावरण, आहार, आरोग्य याविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी रोहित काळे यांनी वाडी-वस्तीवरील शाळा असे उपक्रम राबवते ही बाब कौतुकास्पद आहे, असे शिक्षक लाभणे म्हणजे तुम्ही सर्व खूप भाग्यवान आहात अशा भावना व्यक्त करतांना मला माझे बालपण आठवल्याचे सांगितले. सर्व माताभगिनी  अन विद्यार्थ्यांनी आत्मविश्‍वासपूर्वक खूपच सुंदर प्रश्‍न विचारले याचा मला अभिमान वाटतो दरम्यान त्यांना गहिवरुनही आले व कौतुकाने खूपदा फोटो व शुटींग घेतले.

     शाळेतील प्रयोगशील शिक्षक  पोपटराव फुंदे यांनी  राबवलेल्या जागर प्लास्टीक मुक्तीचा या प्रेरणादायी उपक्रमाचे उपसभापतीसह उपस्थित सर्वांनीच मोठे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments