नगरमध्ये ग्रंथोत्सवाचे आयोजन......

 नगरमध्ये ग्रंथोत्सवाचे आयोजन


नगर,दि. ११ - राज्य शासनाच्या ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,अहमदनगर यांचे वतीने सास्कृतिक धोरण २०१० अंतर्गत शुक्रवार दि.१३ व शनिवार दि.१४ मार्च रोजी नगर येथील न्यु आर्टस,कॉमर्स-सायन्स कॉलेजच्या छत्रपती राजर्षि शाहू महाराज सभागृहामध्ये ग्रंथोत्सव २०१९ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी दिली.

शुक्रवार दि.१३ मार्च रोजी सकाळी १० वाजता राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालक मंत्री ना.हसन मुश्रीफ यांचे अध्यक्षतेखाली व आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख,राज्य ऊर्जा राज्य मंत्री  प्राजक्त तनपूरे,जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, महापौर बाबासाहेब वाकळे,खासदर सदाशिव लोखंडे,खासदार डॉ.सुजय विखे,आमदार डॉ.सुधीर तांबे,आमदार  अरुणकाका जगताप,आमदार बबनराव पाचपुते,आमदार राधाकृष्ण विखे,आमदार  मोनिका राजळे,आमदार संग्राम जगताप,आमदार लहू कानडे आमदार किरण लहामटे,आमदार निलेश लंके,आमदार रोहित पवार,आमदार आशुतोष काळे,जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, राज्याचे प्रभारी ग्रंथालय संचालक सु.हि.राठोड,नाशिक विभागाच्या सहाय्यक ग्रंथालय संचालक क.सु.महाजन,मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे,सचिव जी.डी. खानदेशे यांचे प्रमुख उपस्थितीत ग्रंथोत्सव २०१९ चे उद्घाटन होणार आहे.
 
 शुक्रवार दि.१३ रोजी दुपारी १२ वाजता "ग्रंथालय आणि वाचन संस्कृती" या विषयावर डॉ.लक्ष्मीकांत येळवंडे यांचे अध्यक्षतेखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.डॉ. कैलास दौंड, डॉ.गुंफा कोकाटे, डॉ.बापू चंदनशिवे,डॉ.वैशाली भालसिंग,डॉ. राजकुमार घुले,संगीता निघे हे या परिसंवादामध्ये सहभागी होतील.दुपारी  ३ वाजता "प्रभावी वाचन माध्यमे"या विषयावर जेष्ठ साहित्यीक डॉ.संजय कळमकर यांचे अध्यक्षतेखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रांचे संपादक,आवृत्ती प्रमुख हे परिसंवादामध्ये सहभागी होणार आहेत.शनिवार दि.१४ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत जेष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांचे अध्यक्षतेखाली व गीतकार-साहित्यिक बाबासाहेब सौदागर यांचे प्रमुख उपस्थितीत "कवी संमेलन" आयोजित करण्यात आले आहे.

दुपारी १:३० वाजता जेष्ठ साहित्यिक डॉ चं. वि. जोशी यांचे अध्यक्षतेखाली व जयंत यलूलकर,प्रा.मेधा काळे,डॉ.सुधा कांकरिया, भूषण देशमुख, डॉ.संदीप सांगळे,भूपाली निसळ, प्राचार्य एम एस तांबे,शब्बीर शेख यांचे उपस्थितीत "ग्रंथाने मला काय दिले" या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे.दुपारी ३ वाजता आमदार लहू कानडे यांचे अध्यक्षतेखाली व डॉ.भास्करराव झावरे,बाबासाहेब खराडे,संदीप मिटके,महेश घोडके,निलेश भदाणे,मुकेश मुळे यांचे उपस्थितीत "ग्रंथोत्सवाचा समारोप होणार आहे.या शिवाय शुक्रवार दि.१३ मार्च रोजी सकाळी चितळे रोड येथील जिल्हा वाचनालयापासून चौथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.या ग्रंथदिंडीचा शुभारंभ जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांचे हस्ते होणार आहे.ग्रंथवाचक गैरव प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

नगर येथील न्यु आर्टस,कॉमर्स-सायन्स कॉलेजच्या छत्रपती राजर्षि शाहू महाराज सभागृहात होणाऱ्या या ग्रंथोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, सदस्य शिक्षणाधिकारी दिलीप थोरे,जिल्हा माहिती अधिकारी दिपक चव्हाण,चंद्रकांत पालवे,गणेश भगत,सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments