स्पर्धेच्या जगतात वेळ,गुणवत्ता ,तत्पर सेवा यांनाच महत्व


स्पर्धेच्या जगतात वेळ,गुणवत्ता ,तत्पर सेवा यांनाच महत्व 

पोपट पवार : ४९ वा जागतिक औद्योगिक सुरक्षा सप्ताह 

वेब टीम नगर ,दि. ९-सध्याच्या नवीन यांत्रिकीकरण्याच्या सर्वच क्षेत्रातील  गतिमान  युगात .स्पर्धेच्या जगतात वेळ,गुंणवत्ता  ,तत्पर सेवा ,याचे महत्व दिवसदिवस  वाढत चाललेले असून याच बरोबर सुरक्षिततेचे प्रश्नही उद्योग जगताला  भेडसावत आहेत यासाठी सर्वांनी  औद्योगिक सुरक्षिततेला प्राधान्य देऊन शिस्त व   नियमान बरोबर सुरक्षा उपकरणांचा सातत्याने वापर करणे हि बाब अतिशय गरजेची बनली असल्याचे प्रतिपादन आदर्श  हिवरे बाजारचे प्रणेते पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले ४ ते ११ मार्च पर्यंत ४९ व्या  जागतिक औद्योगिक सुरक्षा सप्ताह निमित्त औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग व मार्ग या संघटनेच्या वतीने  औद्योगिक वसाहतीतील सिद्धी लॉन येथे  औद्योगिक सुरक्षा वाढीस लागावी यासाठी उद्योजक ,कामगार व कर्मचाऱ्यासाठी  साठी   प्रबोधनात्मक अश्या आयोजित कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी पवार  बोलत होते . या कार्यक्रमाचा  शुभारंभ  पदमश्री पोपटराव   पवार यांच्या हस्ते दीप प्रजवलनाने करण्यात आला .यावेळी व्यासपीठावर  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाचे सचिव न्यायाधीश सुनिलजीत पाटील ,लार्सन अँड टुब्रो कंपनीचे जनरल मॅनेजर अरविंद पारगावकर सुरक्षा व आरोग्यविभागाचे उपसंचालक स्वप्नील देशमुख ,ॲड .  पागीरे  .उद्योजक कारभारी भिंगारे ,श्रीहरी टिपूगुडे उपस्थित होते .कार्यक्रमाच्या सुरवातीला उपसंचलक स्वप्नील देशमुख यांनी सर्वांचे स्वागत व  केले व  आयोजनामागील उद्देश  स्पष्ट  केला .भारतातील उद्योग क्षेत्रासाठी अतिशय उपयोगी अश्या विविध  सुरक्षा उपकरणाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे येथे दालने असून दोन मोठी वाहने देखील सुरक्षिततेच्या उपकरणासह ठेवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले उपस्थित हजारो नि याची माहिती घेतली.या कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते . त्यामध्ये  १०२ जणांनी उस्फुर्त पणे रक्तदान केले नगरमधील मोठ्या व प्रथितयश कंपनीच्या मालकांनी ,संचालकांनी यासाठी मोठे सहकार्य केले त्यांचे देशमुख यांनी  आभार  मानले .महेंद्र त्रिगुणे यांनी सुरक्षा ,स्वास्थ  व पर्यावरण याचे रक्षण करण्याची सर्वांना शपथ दिलीव  या मागील राष्ट्रहित जपण्याची भावना त्यानी मांडली . औद्योगिक क्षेत्रात काम करताना सुक्षिततेचे नियम पाळणारे कायम सतर्क  असलेल्या २० कामगारांचा पदमश्री पवार यांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन विशेष  सन्मान करण्यात आला .        पदमश्री पोपटराव पवार यांनी या प्रसंगी या कार्यक्रमाचे संयोजक स्वप्नील देशमुख यांच्या   या सुरक्षिततेविषयक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे कोतुक केले .सुरक्षिततेचा ध्यास घेतलेला हा एक सच्चा कार्यकर्ता असून ,सामाजिक जाणिवेतून सातत्याने नगरमध्ये आल्यापासून गेल्या दोन वर्षांपासून  औद्योगिक सुरक्षिततेला महत्व देऊन  त्यास     प्राधान्य देण्यासाठी ,त्यातील गंभीरता समजून समाजात ,उद्योग जगतात  जागरूकता निर्माण करण्यासाठी  उद्योजकांना संघटित करून मार्ग या संघटनेच्या माध्यमातून सुरु असलेला हा प्रयत्न निश्चितच गौरवास्पद असाच  आहे, याचे भविष्यात निश्चितच चांगले परिणाम आपणास पाहवयास  मिळतील असे सांगितले . ते पुढे म्हणाले कि अहमदनगरच्या उद्योगिक वाढीसाठी सुरक्षितता  महत्वाची तर आहेच परंतु  नगरच्या औद्योगिकतेला देखील  भविष्यात चागले दिवस असतील कारण नाशिक ,पुणे औरंगाबाद येथे उद्योग वाढीसाठी जागेची कमतरता भासत हे  हे नगरकरांनी लक्षात घावे .व आपल्या व्यवसायाची वृद्धी करावी असे आवाहन केले देश परदेशातील पर्यावरण व सुरक्षा विषयाचे अनुभव कथन  देखील  पवार यांनी केले .पाणी व्यवस्थापन हे नगरच्या उद्योजकांनी करावे त्यास प्राधान्य धवे कारण पाण्याची बचत ,पुनर्वापर यावर जर एखाद्या परिसंवादाचे आयोजन केले तर त्यासाठी मी सर्व  सहकार्य करेल यातून एखादा आदर्श मॉडेल प्रकल्प जर उभा राहिला तर तो देश्याच्या अधिक उन्नत्ती साठी कामाला  येईल तसेच उद्योजकांच्या प्रश्न संबंधी मी मुख्यमंत्री ,उद्योगमंत्री यांची उद्योजकांसमवेत   भेट घेऊन हे प्रश्न कसे सोडविता येतील यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करेल असे आश्वासन  दिले ज्ञानेश्वर ढमाले यांनी आभार मानले .या कार्यक्रमामध्ये कर्मचारी कामगार व अधिकारी  यांनी सुरक्षिततेत विषयक पोवाडे, नाटिका ,प्रवचने ,,कविता ,भारूड व पोस्टर्स या माध्यमातून जागरूकता करण्याचा प्रयत्न केला.यशस्वीतेसाठी कमिटी सदस्य  ज्ञानेश्वर ढमाले सुभाष तोडकर ,सचिन ठोसर ,महेंद्र त्रिंगुने ,संग्राम कदम ,चैतन्य खानवेलकर,बी आर साबळे ,जीवन चाबुकस्वार ,अंजली मगर ,सचिन चंगेडे ,हृदयकुमार सिंग ,मर्लिन एलिसा,राम पवार   यांनी परिश्रम घेतले .  तर नगरमधील एक्साईड, होग्यानस ,जि. के. एन ,.सनफारमा ,के .एस .पी. जी ,यु .के. एल ..गालको,इंडियन ऑइल .अल्विन कारमेल .ग्लोबल एच आर .मॅनेजमेन्ट , गोदावरी ,अडोर  वेल्डिंग ,भारत पेट्रोलियम ,सिद्धी फोर्जिंग ,आमी संघटना ,आय .एस. एम. टी.लार्सन अँड टुब्रो,कमिन्स ,क्लासिक व्हील ,ईटॉन,व मार्ग संघटनेचे योगदान  सहकार्य लाभले .   

Post a Comment

0 Comments