संविधान नागरिकांत भेद करीत नाही
डॉ विश्वंभर चौधरी - महाले , आरकल पुरस्काराचे वितरणवेब टीम नगर,दि. ३ -संविधान नागरिक नागरिकांत भेद करत नाही, एकाही धर्माचा उल्लेख त्यात नाही, संविधान धर्मनिरपेक्ष आहे हे आपण जो पर्यंत समजून घेत नाही तो पर्यंत आपण फक्त मतदार असू जागृत नागरिक होऊ शकत नाही, जागृत नागरिक होण्यासाठी संविधान समजून घेवून तशी कृती करून आपण खरे राष्ट्रवादी होऊ शकतो तेव्हाच आपले राष्ट्र मजबूत होऊ शकते असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजकीय विश्लेषक डॉ विश्वंभर चौधरी यांनी प्रतिपादन केले.
विचारधारा,जिज्ञासा अकादमी व मातृ संघटना राष्ट्र सेवादल यांच्या संयुक्तपणे देण्यात येणारा स्वातंत्र्यसेनानी डॉ.एस.टी. महाले स्मृती पुरस्कार क्रीडामहर्षी किसनराव आरकल स्मृती पुरस्काराचे वितरण प्रसंगीसंविधान आणि राष्ट्रवाद या विषयावर ते बोलत होते अध्यक्षस्थानी संविधान अभ्यासक प्रा. सुभाष वारे हे होते. यावेळी मंचावर विचारधारचे अध्यक्ष व संयोजकविठ्ठल बुलबुले, शकुंतला महाले, व्यंकटेश आरकल, सेवादलाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया मैड उपस्थित होत्या. यावेळीपुणे येथील सामाजिक कार्यकर्तेदत्ता भंडार यांना स्वातंत्र्यसेनानी डॉ.एस.टी. महाले स्मृती पुरस्कार तर अहमदनगरच्या विवेक पवार यांना क्रीडामहर्षी किसनराव आरकल स्मृती पुरस्कारचौधरी व वारे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
चौधरी पुढे म्हणाले ज्यांनी तिरंग्याला विरोध केला, ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीची चेष्टा केली जे राज्यघटनेला सतत विरोध केला ते आज देशाच्या मतदारांना राष्ट्रवाद शिकवत आहेत. म्हणून आपण आता नुसते मतदार असून भागणार नाही तर सजग व सृजन नागरिक होणे महत्वाचे आहे. असे ते म्हणाले.
पुरस्काराबाबत व व्याख्यानाबाबत बीज भाषण करताना विचारधाराचे अध्यक्ष विठ्ठल बुलबुले म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीनेदेशनव्याने उभा करण्याचे स्वप्न दिले आणिजिद्दीनेइंग्रजांविरुद्ध लढलो आज मात्र स्वतंत्र देशात काही मंडळी गल्ली गल्लीत घराघरात, मनामनातजातीच्या नावाने धर्माच्या नावाने विष पेरण्याचे काम करीत आहे, राष्ट्रप्रेमाच्या नावाखाली धर्मद्वेष पसरवण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात आहे. हे उधळून लावण्यासाठी अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमांची आवश्यकता वाढली आहे.असे ते म्हणाले.
अध्यक्षस्थानावरून बोलतानाप्रा. सुभाष वारे म्हणाले की,संविधानातभारतीयत्व नाही असे जे म्हणत आहेत त्यांना जाहीर सांगू इच्छितो की, संतांनीजे प्रबोधन केले ते समता,बंधुता,शांती, क्षमा, धर्मनिरपेक्षता, स्त्रियांचा व सर्वजाती धर्मांचा मानवतेचा आदर ही मूल्य संविधानात दिसतात.हे सर्व भारतीय संतांनी रुजवलेले आहे व ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानात ठळकपणे आणलेले आहे. सकाळ दुपार संध्याकाळ वंदेमातरम् भारतमाता की जय असे म्हणत इतरवेळी महिलांचा अनादरकरणे, जातीभेद करत माणसांचा अपमान करणे, आपला व्यवसायातआर्थिक शोषण करणे परधर्माचा दिवसभर द्वेष करणे ढोंगी राष्ट्रवाद आहे. सध्या असा ढोंगी रष्ट्रवाद देशात वाढत आहे. हे ढोंग संपवण्यासाठी मजबूत संविधान सक्षम आहे. ते संविधान मनामनात पोहचवण्याचे काम प्रत्येक भारतीय नागरिकांनी करावे असे ते म्हणाले.शेवटीसभागृहातील नागरिकांना प्रश्न विचारण्याचे आवाहन दोन्ही पाहुण्यांनी केले व प्रश्नोत्तरे झाली.
यावेळीपुरस्काराचे मानकरी दत्ता भंडार व विवेक पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता गाडेकर यांनी केले. पुरस्कारार्थींचा परीचय अपर्णा राऊत व शिवानी शिंगवी यांनी करून दिला. आभार राष्ट्र सेवादलाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया मैड यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
पुरस्कार रकमेतून संविधान शिक्षणअभियान
विवेक पवार यांनी पुरस्काराची ३००० रुपयेची रक्कम राष्ट्र सेवादल कार्यासाठी दिली तर दत्ताभंडारयांनी रक्कम ५००० रुपयात स्वता:चे ५००० रुपये टाकून एकूण दहा हजार रुपयांची संविधांची पुस्तके राष्ट्र सेवादलास दिली व संविधान शिक्षणअभियानसुरुकरावे अशी विनंती भंडार यांनी केली.
0 Comments