आवडत्या क्षेत्रात करिअर करा यश नक्की मिळेल
सुनील रामदासी : मेहेर इंग्लिश स्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभवेब टीम नगर ,दि. २- दहावीची परीक्षा ही जीवनाला कलाटणी देणारी आहे.मोठे होण्यासाठी स्वप्न बघावे व त्या स्वप्नाचा पाठलाग केल्यास यशस्वी व्हाल.दहावीनंतर क्रीडा,शैक्षणिक,आयटी,तसेच डॉक्टर,वकील,इंजिनिअर अश्या अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध आहे.दहावीला चांगले गुण मिळवा.आवडते क्षेत्र निवडून करिअर करा यश नक्की मिळेल.असे प्रतिपादन हिंदसेवा मंडळाचे माजी मानद सचिव सुनील रामदासी यांनी केले.
हिंदसेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कुल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात झाला.याप्रसंगी हिंदसेवा मंडळाचे माजी मानद सचिव सुनील रामदासी बोलत होते.याप्रसंगी हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक,कार्याध्यक्ष अजित बोरा,मेहेर इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष जगदीश झालानी,विश्वहिंदू परिषदेचे जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे,प्रेस फोटोग्राफर अमोल भांबरकर,मेहेर इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी,दादा चौधरी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष येवले, प्रा.संजय साठे,दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय मुदगल, संगीता पालवे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शाळेला ड्रमसेट भेट दिला.या कार्यक्रमात महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अमोल भांबरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.तसेच खेलो इंडियात निवड झाल्याबद्दल पारस नातू व वरद सुर्वे यांचा सत्कार करण्यात आला.दहावीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प व पेन देऊन शुभेच्छा दिल्या .
प्रा.शिरीष मोडक म्हणाले कि,दहावी हा जीवनातील टर्निंग पॉईंट आहे.परीक्षेत उत्तम गुण मिळवा. दहावीनंतर हिंदसेवा मंडळाच्या सारडा महाविद्यालयात मेहेर इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने ११ वी इयत्तेत प्रवेश दिला जाईल. कार्याध्यक्ष अजित बोरा म्हणाले कि,शाळेच्या निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवा.परीक्षेत यश मिळवून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा व शाळेचे नाव उज्वल करा.अभ्यास करा परीक्षेला सामोरे जाताना प्रसन्न व आनंदी मनाने पेपर द्यावा.दहावीच्या विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले.सूत्र संचालन अथर्व पवार यांनी केले तर आभार अथर्व पन्हाळे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
0 Comments