.
विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्वाच्या सर्वांगिणविकासासाठी तयार केलं पाहिजे
भारती शेवते - ओंकार कॉम्प्युटर्स , अलंकार ब्युटी ट्रेनिंगच्या वतीने डिजिटल सहेली उपक्रमवेब टीम नगर,दि.८ - जीवघेण्या स्पर्धेच दडपण मुलांवर येवू नये यासाठी काही वर्षांपूर्वी मेरिटलिस्ट बंद करण्यात आली. या निर्णयाचं कौतुकही झालं होतं.पण आता पुन्हा मेरिटलिस्ट द्यावी का याबद्दल चर्चा सुरू झालीय. आपल्या परिक्षा पद्धतीत अमुलाग्र बदल करण्याची गरज असून विद्यार्थ्यांना फक्त मार्क्स मिळविण्यासाठी नाही तर व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास होण्यासाठी तयारकेलं पाहिजे, असे प्रतिपादन भारती शेवते यांनी केले.
ओंकार कॉम्प्युटर्स व अलंकार ब्युटी ट्रेनिंग सेंटर आयोजित भिंगारमध्येझालेल्या ’डिजिटल सहेली’ कार्यक्रमात भारती शेवते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी क्रीडा क्षेत्रातील अंजली देवकर, शिक्षण क्षेत्रातील भारती शेवते व ब्युटिशिअन क्षेत्रातील स्वाती अट्टल प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थितहोत्या. यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
यावेळी कुस्तीपटू अंजली देवकर म्हणाल्या, ‘चुल आणि मूल’ या चाकोरीतून महिलांना घराबाहेर काढणे तसेच क्रीडा मैदानात त्यांच्यातील गुणवत्तेला चांगले व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा विविध संघटना प्रयत्न करतआहे. त्यामध्ये महिलांनी उत्स्फुर्त सहभागी व्हावे आणि आपल्या कला-गुणांनायोग्य दिशा देण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाची प्रस्तविकात ओंकार कॉम्पुटरच्या शितल भुतकर म्हणाल्या कि, महिलांना सक्षम बनविण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.कारण महिला सक्षम झाल्यातर मुलांना त्या योग्य ते मार्गदर्शन करुन त्यांच्याविचारांना आणि कला-गुणांना योग्य स्थान देतील. त्यासाठीच अशा आगळावेगळा उपक्रमाचे आयोजन केले गेले आहे.
कार्यक्रमास आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते डॉ.अमोल बागुल, महाराष्ट्रराज्य टंकलेखन व लघुलेखन संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे, पंडितहॉस्पिटलचे डॉ.ऋषिकेश पंडित व रेश्मा आठरे यानी देखील उपस्थित राहुन मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
0 Comments