फटाका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्षपदी श्रीनिवास बोजा ,सचिवपदी संतोष बोरा यांची निवड

फटाका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्षपदी श्रीनिवास बोजा ,सचिवपदी संतोष बोरा यांची निवड

वेब टीम नगर,दि. २६ -अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली असून अध्यक्षपदावर श्रीनिवास बोज्जा यांची निवड झाली आहे.  त्यांनी विरोधी उमेदवार सुरेश खरपुडे  यांचा २५ विरोधात २१ मतांना पराभव केला. निवडणूक निर्णय अधिकारी ॲड सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडली .


निवडणुकी नंतर नूतन अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांचा सर्व सदस्यांनी सत्कार केला.
       यावेळी बोलतांना श्रीनिवास बोज्जा म्हणाले, फटका व्यापारी असोसिएन च्या सर्व सदस्यांनी माज्यावर विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा सेवेची संधी दिली आहे. या विश्वासाला तडा जाऊ न देता सर्वांना बरोबर घेऊन असोसिएशनचे प्रश्न सोडवण्या बरोबरच वर्षभर विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी मला सर्वांची साथ हवी आहे.यावेळी लगेचच फटका व्यापारी असोसिएशनची कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली
संपूर्ण कार्यकारणी पुढील प्रमाणेअध्यक्ष - श्रीनिवास बोज्जाउपाध्यक्ष -  निखिल परभने व सोमनाथ रोकडे,सेक्रेटरी - संतोष बोरा
जॉईंट सेक्रेटरी - अरविंद साठे,कार्याध्यक्ष - सुरेश जाधव,कार्यकारणी संचालकगणेश परभने, उमेश क्षिरसागर, अमोल तोडकर,
 शिवम भगत, अधिक कर्डीले, संजय जंजाळे, शिरीष चंगेडे राजेंद्र छल्लानी, देविदास ढवळे, दाजी गारकर, संतोष वल्ली.
निमंत्रित सदस्य पुढील प्रमाणेलक्ष्मण देवकर, अनिल टकले, संतोष तोडकर, सुनील गांधी  व जयप्रकाश बोगवत आदी
सर्व नूतन पदाधिकारीचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला

Post a Comment

0 Comments