गोंदवलेकर महाराजांचा नामोपदेश हीच जीवनाच्या तत्वज्ञानाची ओळख


गोंदवलेकर महाराजांचा नामोपदेश 

हीच जीवनाच्या तत्वज्ञानाची ओळख

 हभप गणेश महाराज कुदळे  - शिलाविहारला भागवत कथेची काल्याच्या किर्तनाने सांगता
वेब टीम नगर,दि. ६ - रामनाम स्मरण हेच भक्ती साधन आहे. नाम हे परमेश्वेर प्राप्तीचे कर्म-योग-ज्ञान या मार्गापेक्षा श्रेष्ठ आहे. भगवंताची अनेक रुपे नाहिशी झाली तरी त्यांचे नाम देशकालातीत असते. गोंदवलेकर महाराजांचे संपूर्ण जीवन रामनामोपासनेची साधना अंत:काळापर्यंत केली. सर्वसामान्यांना उपदेश करण्यात रामनामाचे महत्व सांगण्यातच आयुष्य वेचले. त्यामुळेच त्यांच्या जीवनाची ओळख नामोपदेश म्हणून आहे, असे प्रतिपादन हभप रामयणाचार्य गणेश महाराज कुदळे यांनी केले.
     सावेडीमधील श्रीराम चौकाजवळील शिलाविहार येथे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात गुरुवारी सकाळी६.५५ वा. जन्मोत्सव साजरा झाला. ७ दिवस अखंड नामजप, भागवत कथा सप्ताहाची सांगता पालखी मिरवणुक, ग्रंथदिंडी व काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने झाली. यावेळी भाविकांना गोंदवलेकर महाराज यांच्या जन्माविषयी समाजकार्य, तात्विक विचार व भक्तीसाधना विषयावर कुदळे महाराज यांनी किर्तनातून मार्गदर्शन केले. याप्रसंगी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, साई संघर्षचे योगेश पिंपळे, माजी नगरसेवक निखिल वारे आदि उपस्थित होते.
     कुदळे महाराज पुढे म्हणाले, नाम हेच मोक्षसाधन आहे. गोंदवलेकर महाराजांचा नामोपदेश हीच त्यांच्या जीवनाची, तत्वज्ञानाची खरी ओळख आहे. गृहस्थाश्रम स्विकारुन देखील त्यांनी परमार्थिक जीवनाला महत्व दिले. रामनामाबरोबरच अन्नदानाला महत्व देत भक्ती हे परमार्थाचे साधन आहे तर रामनाम स्मरण हे भक्तीसाधन आहे. रामनामोपासना सुलभ असून, परमेश्वार प्राप्तीचा सोपा उपाय असल्याचे त्यांना सांगितले.
     शिलाविहार येथे गेले ७ दिवस हभप  शिवगुरु विनायक पारखे शास्त्री यांनी भागवत कथा सांगितली. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्र ग्रंथाचे पारायण करण्यात आले.२४ तास अखंड नाम जपास भाविक उपस्थित राहत होते. पारायणानंतर महाआरती, महाप्रसाद  जन्मोत्सव झाल्यावर परिसरातून पालखी मिरवणुक काढण्यात आली. पालखीचे पूजन नगरसेविका रुपालीताई वारे यांचे हस्ते झाले.
     या सप्ताहासाठी उद्योगपती लिंबाशेठ नागरगोजे, नगरसेविका आशाताई बडे, अशोक बडे, ब्रह्मचैतन्य सेवाभावी मंडळाचे सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभल्याबद्दल हभप सुंदरदास रिंगणे, रेखाताई रिंगणे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments