आजचे थोडक्यात महत्वाचे

थोडक्यात महत्वाचे :

केडगावमध्ये रेणुका माता अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 



वेब टीम  केडगाव (देवी),दि. २९ -  येथे रेणुका माता अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमदभागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २९ फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान रेणुका माता मंदिरासमोर हा सोहळा पार पडणार आहे. हे सप्ताहाचे १६ वे वर्ष आहे.
 सप्ताहादरम्यान पहाटे ४ ते ६ काकडा, सकाळी ८ ते १२ तुकाराम गाथा पारायण व भागवत कथा दुपारी १.३० ते ५.३० हरिपाठ रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत हरिकीर्तन असा कार्यक्रम पार पडणार आहे. हभप ज्ञानेश्वर भगत, हभप भरत सोडगीर, हभप वैष्णवानंद गर्जे, हभप चैतन्य राऊत, हभप सोमनाथ कराळे, हभप पुरुषोत्तम पाटील, हभप ज्ञानेश्वर पठाडे आदींची कीर्तनरूपी सेवा होणार आहे. हभप विकासानंद मिसाळ यांचे शनिवार दि.७ मार्च रोजी काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाच्या वाटपाने  सप्ताहाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजक भागीनाथ कोतकर, राघु ठुबे, बहिरू कोतकर, जगदंबा तरुण मंडळ, जगदंबा ग्रुप, शिवमुद्रा ग्रुप केडगाव देवी आदींनी केली आहे,

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रामकरण सारडा वसतिगृहाची उज्वल यशाची परम्परा कायम ठेवावी



 प्राचार्य दोडके - रामकरण सारडा वसतीगृहातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात 

वेब टीम नगर,दि. २९ -रामकरण सारडा वसतिगृहात समाजातील तळागाळातील वंचीत व निराधार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे महान कार्य १०५ वर्षांपासून घडत आहे. या वसतिगृहातील माजी विद्यार्थी  बी जी कोळसे पाटील (माजी न्यायमूर्ती), विठ्ठलराव माणिक (आयकरआयुक्त) यांनी नेत्रदीपक यश संपादन करून उच्च पदावर कार्य केले आहे.त्यांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी रामकरण सारडा वसतिगृहाची उज्वल यशाची परम्परा कायम ठेवावी.अध्यक्ष श्यामसुंदर सारडा यांच्या प्रयत्नामुळे रामकरण सारडा वसतिगृहाची सुन्दर अशी वास्तू तयार झाली आहे.विद्यार्थ्यांना सोयी सुविधा उत्तमरीतीने पुरविल्या जात आहेत हि कौतुकास्पद बाब आहे.असे प्रतिपादन रेसिडेन्सील कॉलेजचे प्राचार्य ए.आर.दोडके यांनी केले.    
रामकरण सारडा वसतीगृहातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला  याप्रसंगी मार्गदर्शन करताना रेसिडेन्सील कॉलेजचे प्राचार्य ए.आर.दोडके बोलत होते.यावेळी हिंदसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा,सिताराम सारडाचे अध्यक्ष  प्रा.मकरंद खेर,माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा,बजरंग दरक, वसतीगृहाचे अध्यक्ष  श्यामसुंदर सारडा,सी एस आर डी कॉलेजचे प्रा.रवीकुमार राठोड,दादा चौधरी शाळेचे मुख्याध्यापक संजय मुदगल,सुखदेव नागरे,अजय महाजन वसतीगृहाचे अधिक्षक बंडू भोसले आदी उपस्थित होते.    

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉ. विश्‍वंभर चौधरी यांचे रविवारी ‘संविधानआणि राष्ट्रवाद’या विषयावर व्याख्यान


स्वातंत्र्यसेनानी डॉ.महाले व क्रीडामहर्षी आरकल पुरस्कार वितरण

      वेब टीम नगर,दि.२९ - विचारधारा, जिज्ञासा अकादमी व मातृ संघटना राष्ट्र सेवादल यांच्या संयुक्तपणे देण्यात येणारा स्वातंत्र्य सेनानी डॉ.एस.टी. महाले स्मृती पुरस्कार क्रीडामहर्षी किसनराव आरकल स्मृती पुरस्काराचे वितरण रविवारी दि.१ मार्च रोजी सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्‍लेषक,पर्यावरणवादी नेते डॉ. विश्‍वंभर चौधरी यांच्या हस्ते होणार असून यावेळी ‘संविधान आणि राष्ट्रवाद’ याविषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संविधान अभ्यासक प्रा.सुभाष वारे असणार असल्याची माहिती विचारधाराचे अध्यक्ष प्रा. विठ्ठल अंभी बुलबुले, राष्ट्र सेवा दलाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया मैड यांनी दिली.
     १९९८ पासून देण्यात येणारा स्वातंत्र्यसेनानी डॉ.एस.टी.महाले स्मृती पुरस्कार पुणेयेथील पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता भंडार यांना तर अहमदनगरच्या विवेक पवार यांना क्रीडामहर्षी किसनराव आरकल स्मृती पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.यावेळी स्वातंत्र्यसैनिक शकुंतला महाले, व्यंकटेश आरकल हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. दत्ता भंडार यांना देण्यात येणार्‍या महाले पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, स्मृतीचिन्ह,पुस्तके व पाच हजार रुपये रोख असून विवेक पवार यांना देण्यात येणार्‍या आरकल पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, स्मृतीचिन्ह, पुस्तके व तीन हजार रुपये रोख असे आहे.
          यावेळी डॉ. विश्‍वंभर चौधरी, प्रा. सुभाष वारे हे अतिथी संविधान आणि राष्ट्रवादा  विषयावर आपले विचार व्यक्त करतील. सायं ५;३० वा रावसाहेब पटवर्धन स्मारक सावेडी येथे हा हे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन बापू जोशी, अनघा राऊत,संगीता गाडेकर, कल्पना बुलबुले, शिवानी शिंगवी, पियुष मंडलेचा,अंबादास कोडम, तारिक शेखआदी मान्यवरांनी केले आहे. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जिल्हा वाचनालयाच्यावतीने मराठी राजभाषा दिन साजरा



   वेब टीम  नगर,दि.२९ - अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्यावतीने मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा झाला. वाचनालयाच्या संचालिका व ज्येष्ठ साहित्यिक मेधाताई काळे यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.  यावेळी वाचनालयाच्या उपाध्यक्षा शिल्पा  रसाळ, संचालक दिलीप पांढरे, किरण आगरवाल, अनिल लोखंडे, निमंत्रित  सदस्य चंद्रकांत पालवे, गणेश अष्टेकर, ग्रंथपाल अमोल इथापे, वाचक डॉ.दगडे आदि उपस्थित होते.
            प्रा.काळे म्हणाल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्याविषयी आपण अग्रही असणे जरुरीचे आहे. मराठी भाषेचा न्यूनगंड बाळगू नये. मराठी भाषेला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे मराठी वाचणे, बोलणे, लिहिणे तसेच व्यवहारामध्येही मराठीचा वापर करणे गरजेचे आहे. 
             प्रास्तविकात उपाध्यक्षा शिल्पा रसाळ यांनी कुसुमग्रजांच्या साहित्यकृतींचा आढावा घेत मराठी भाषा अनिवार्य असावी, या विषयी प्रतिपादन केले.    यावेळी वाचनालयात असणार्‍या कुसुमाग्रजांच्या विविध साहित्य संपदेचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. वाचकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. शेवटी गणेश अष्टेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी कर्मचारी पल्लवी कुक्कडवाल, अलका घबाडे, वर्षा जोशी, कुमार गोटला, संकेत फाटक, संजय गाडेकर, शेख , विठ्ठल शहापूरकर यांचे सहकार्य लाभले.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्व:कमाई मधील काही दान देणे परमार्थात भगवंतांच लेण


 बाळासाहेब भुजबळ -  पिंपळनेरला निळोबाराय पुण्यतिथीस भक्तांकडून देणगी रुपाने सेवा 
  वेब टीम नगर,दि.२९ - आज आपण आपल्याकडे जे नाही, त्याचा विचार करीत असतो आणि भगवंतांने जे दिले त्याकडे दुर्लक्ष करतो. समाजातील बदलांबरोबर आपण बदलले पाहिजे हे जरी खरे असले तरी भगवंत कृपेने आपल्याला मिळालेले जे काही असते, त्यामधील एक टक्का जरी समाजासाठी दिला तरी पुण्य लाभते. स्व:कमाई मधील काही रुपये परमार्थात दान देणं हे भगवंतांचे लेणं समजतात. हे लेणं सर्वांनी लुटले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले.

     पारनेर तालुक्यातील पिंपळनेरला श्री संत निळोबाराय पुण्यतिथी सोहळा व नाभिक मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी भक्तांकडून देणगीरुपाने सेवा करणार्‍यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भुजबळ बोलत होते. या सोहळ्यास पारनेर तालुका भाजपा अध्यक्ष वसंत चेडे, जि.प.सदस्या राणीताई लंके, पिंपळनेरच्या सरपंच शितल रासकर, माजी जि.प.सदस्य विश्‍वनाथ कोरडे, नगरचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त नंदा राऊत आदि मान्यवर उपस्थित होते. 
     याप्रसंगी पाहुण्यांनी श्री. संत निळोबाराय यांच्या जीवन चरित्रावर प्रक़ाश टाकला. देणगी देणार्‍या भाविकांचे मनापासून आभार मानले. या सोहळ्यानिमित्त माजी खा.दिलीप गांधी यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या सभा मंडपाचे उद्घाटन सुवेंद्र गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. मंदिराच्या विस्तारीकरण व सुशोभिकरणासाठी भविकांच्या देणगीरुपाने आलेली मदत मोलाची ठरेल, असे पारनेर नाभिक महामंडळाचे तालुकाध्यक्ष भाऊ बिडे यांनी प्रास्तविकात सांगितले.उपाध्यक्ष शाम साळूंके यांनी मार्गदर्शनपर भाषणात देणगी दिलेल्या भक्तांची नावे जाहीर केली. यामध्ये बाळासाहेब भुजबळ ४१ हजार रु., संतोष घायतडक व गोरख शिंदे प्रत्येकी ११ हजार रु., माऊली गायकवाड , बापूसाहेब औटी, जनार्दन राऊत, संजय क्षीरसागर यांनी प्रत्येकी ५ हजार रुपयांचे देणगी दिली. याप्रसंगी नाभिक महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष शाम जाधव, पारनेर युवा तालुकाध्यक्ष प्रसाद भोसले, सहसचिव सुनिल आतकर, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मनोहर राऊत, रमेश बिडवे, वनिता बिडवे, चंद्रकांत काशिद, राजेंद्र ताकपिरे, सोमनाथ कदम, आदिनाथ बांगर,  यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपळनेर सरपंच शितल रासकर यांनी सर्वांचे आभार मानले.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रविवारी डॉ.मांडे यांचा अमृत महोत्सव व पुस्तकांचे प्रकाशन


    वेब टीम नगर,दि.२९ - प्रसिद्ध लेखक व डॉ.अरुण मांडे यांच्या अमृत महोत्सव व चार पुस्तकांचे प्रकाशन रविवारी दिनांक 1 मार्च रोजी सकाळी 11 वाजता, रावसाहेब पटवर्धन सभागृह, सावेडी, नगर येथे हा कार्यक्रम होणार असून यावेळी लेखक प्रा.डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे आणि लेखिका प्रा.डॉ.लीला गोविलकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

     यावेळी विविध लेखकांनी लिहिलेल्या चार पुस्तकांचे प्रकाशन प्रसिद्ध लेखक व डॉ. अरुण मांडे यांच्या हस्ते होणार आहे.  वयाची आणि पुस्तकांची पंच्याहत्तरी पूर्ण करणार्‍या नाटक,  नभोनाट्य आणि विविध विषयांवरील लेख लिहिणार्‍या तसेच साहित्य क्षेत्रातील अनेकविध पुरस्कारांनी गौरवलेल्या डॉ. अरुण मांडे यांचा अमृत महोत्सवी सत्कार यावेळी करण्यात येणार  आहे

     यावेळी  लोक परंपरेतील खेळ- हे लेखक प्रभाकर मांडे व लेखिका संज्योत महाजन, लोकचित्रकला- लेखक प्रभाकर मांडे व अंजली दिवेकर, भाकिते - लेखक प्रभाकर मांडे व  वृषाली मांडे,  हिंदूंचे धर्मचिंतन - लेखिका  गौरी डोखळे या गोदावरी प्रकाशनाच्या चार पुस्तकांचे प्रकाशन डॉक्टर अरुण मांडे यांच्या हस्ते होणार आहे.

Post a Comment

0 Comments