मानसी नाईक यांची छेड काढल्या प्रकरणी
साईनाका पोलिसात गुन्हा दाखल
वेब टीम मुंबई,दि. ८ - प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री मानसी नाईकने आपल्यासोबत छेडछाड झाल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या युवासेना जिल्हाप्रमुखाच्या वाढदिवशी आयोजित कार्यक्रमात ही छेडछाड झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मानसीने मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहेअभिनेत्री मानसी नाईक ५ फेब्रुवारीला पुण्याच्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव येथे संध्याकाळी एका कार्यक्रमासाठी गेली होती. पुण्याचा युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परफॉर्मन्स करत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी गैरकृत्य केलं. त्याने मंचाजवळ जाऊन मानसीला धमकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मानसीकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी मानसीने साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
साकीनाका पोलिसांनी तपासासाठी हे प्रकरण रांजणगाव पोलिसांकडे वर्ग केलं आहे. याशिवाय याप्रकरणी तीन जणांविरोधात कलम ३५४ आणि५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी दिली
0 Comments