उपचारासाठी आर्थिक मदती करिता गझलांचा कार्यक्रम

 आर्थिक मदती करिता गझलांचा कार्यक्रम 


वेब टीम नगर,दि. २२ - एक चांगले वादक आणि गायक कलाकार जयंत चौसाळकर यांच्या तरुण मुलाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्यामुळे स्वतः जयंत रावांनी स्वतःची एक किडनी मुलाला देऊन जीवदान दिले आहे, परंतु त्यामध्ये देखील   ऑपरेशन नंतरच्या दोघांनाही अनेक गुंतागुंतीची ट्रीटमेंट चालू असून ती आयुष्य भर. व पोस्टऑपरेटिव्ह असल्याने कुठल्याही स्किममधे बसतं नाही , त्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे, म्हणून फुकट मदत न घेता, उपरोक्त गझल संध्या हा कार्यक्रम ते स्वतः आर्थिक मदत मिळवण्यासाठी सादर करत आहेत, यासाठी आपण जागरूक नागरिक मंचातर्फे काही फुल न फुलाची पाकळी मदत करावी असे वाटते, यासाठी आपण प्रत्येकाने ही पोस्ट आपल्या नजीकच्या सहकाऱ्यांना पाठवुन किंवा दाखवून काही रोख किंवा जयंत चौसाळकर यांच्या नावाने चेक च्या रूपाने गोळा करून जी जमेल तेवढी सगळी आर्थिक मदत  शनिवार संध्याकाळ ६.०० वाजता रावसाहेब पटवर्धन सभागृह सावेडी येथे उपस्थित राहून द्यावी , तरी ज्यांना शक्य असेल, त्यांनी मदत मिळवायला व ती करायला सहकार्य करावे. 

Post a Comment

0 Comments