जम्मू येथील वैष्णोदेवी मंदिर परिसरात भक्तनिवासासाठी जागा द्यावी

जम्मू येथील वैष्णोदेवी मंदिर परिसरात 

भक्तनिवासासाठी  जागा द्यावी

श्रीरामपूरच्या भक्तांची मागणी
वेब टीम जम्मु /काश्मीर ,दि. १४ -  जम्मू – काश्मीर मध्ये ३७० कलम रद्द झाल्याने महाराष्ट्रातील भाविकांसाठी वैष्णोदेवी मंदिर परिसरात भक्तनिवास उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी श्रीरामपूर येथील जय मातादी मित्र मंडळाच्या वतीने पंतप्रधान कार्यालयाचे कॅबिनेट मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांचे सचिव संजीव शर्मा तसेच जम्मू-काश्मीरचे माजी कॅबिनेट मंत्री श्यामलाल चौधरी यांच्या कडे केली आहे. या मागणीस दोघांनी सकारात्मक प्रतिसाद देत आता येथील ३७० कलम रद्द झाल्याने जागा देण्यास कोणतीही अडचण नाही, लवकरच सरकर निर्णय घेईल असे आश्वासन दिले.
श्रीरामपूर येथील जय मातादी मित्र मंडळाच्या वतीने  गेल्या नऊ वर्षापासून जम्मू येथील वैष्णोदेवीच्या दर्शनास  येथेल  हजारो भाविकांना घेऊन जात आहे. नुकतेच श्रीरामपूर मधून शेकडो भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. मात्र भाविकांना याठिकाणी राहण्यासाठी व थंडी पासून बचावाच्या दृष्टीने  सुविधा मिळाव्यात यासाठी  भक्त निवासासाठीच्या जागेसाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी करत आहे.  याबबत भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्याशी संपर्क साधून श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी, नगरसेवक राजेश अलग, अनिल गुप्ता, हिंद सेवा मंडळाचे सचिव संजय जोशी, कंट्रोड महाराज, महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे अजित पारख अशोक कारखान्याचे संचालक बबन मुठे, यश गुलाटी यांच्या शिष्टमंडळाने सर्व भक्तां सह संजीव शर्मा व श्यामलाल चौधरी यांची भेट घेऊन जागा मागणीचे निवेदन दिले. तसेच जम्मू-काश्मीरचे पूर्व मंत्री  शक्ती राज परिहार, दूरसंचार मंत्रालय राजा कुलदीप सिंग ,भूमी अभिलेख संचालक श्री राजेश शावण , कटरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शशी गुप्ता ,श्यामलाल शर्मा, विजय कुमार यांच्या जम्मू येथे कार्यालयात भेटी घेतल्या व भक्त निवासासाठीच्या जागेची जोरदार मागणी केली.
या मागणीनंतर कटरा येथे अयोजीत माता की चौकी या कार्यक्रमानिमित्त दूरसंचार मंत्रालयांचे सदस्य श्रीराजा कुलदीप सिंग व कटराचे नगराध्यक्ष शशी गुप्ता यांनी आता जम्मू काश्मीर येथे३७० कलम उठल्याने केंद्र शासन देशभरातील राज्यांमधील नागरिकांसाठी तसेच भक्तांसाठी सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार आहे. असे सांगून  आपण केलेल्या जागेच्या मागणी संदर्भात निश्चितच विचार करून महाराष्ट्र भक्त निवासासाठी लवकरात लवकर जागा मिळवून देण्याचे आश्वासित केले. यावेळी सर्व भाविकांनी जय माता दि... जय मातादी....च्या जोरदार घोषणा देत आनंद व्यक्त केला.
यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशांत अलग, धीरज गुजर ,बंटी थापर, अमन अलग, चेतन जगी ,बॉबी सहानी, अनिल छाबडा, गोलू दुगल, बंटी नागपाल, सौरभ पंजाबी, कार्तिक जाधव, भरत कुमार, विषाल गुप्ता, विजय पंजाबी, लकी गुप्ता ,सुशील शिरसाठ, मनोज गागरे, गणेश वर्मा, मोती मिलानी , सुशिल गांधी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले .

Post a Comment

0 Comments