रायसोनी मध्ये 'प्रमाणित योग्यता' या विषयावर वर ३ दिवसीय कार्यशाळा
वेब टीम नगर,दि. १३ - चास येथील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात दिनांक १० फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान तृतीय वर्ष व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाद्वारे प्रमाणित योग्यता वर ३ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेसाठी तज्ज्ञ म्हणून रायसोनी संस्थेच्या सौ. मेघा मोहन यांना बोलावण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कंपन्यांनी आयोजित केलेल्या योग्यतेच्या परीक्षेत वारंवार विचारले जाणारे प्रश्न, ते सोडवण्यासाठी तसेच जटिल गणनांसाठीवापरल्या जाणाऱ्या काही युक्त्या तज्ञांनी शिकवल्या. कार्यशाळेमध्ये वेळ, अंतर, सरासरी, नफा आणि तोटा, रक्त संबंध, कॅलेंडर, मालिका, तार्किक रीजनिंग, आसन व्यवस्था, इंग्रजी भाषा व ग्रामर इत्यादी विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेचा उपयोग विद्यार्थ्यांना प्लेसमेंट व स्पर्धा परीक्षेंसाठी होणार आहे. कार्यशाळेसाठी प्रा. अनिकेत जोशी, प्रा. आशिष कुमार सिंग, प्रा. अश्विनी टाकसाळ, प्रा. श्वेता टिकोटकर, प्रा. शिल्पा लांडे यांनी परिश्रम घेतले व प्राचार्य डॉ. जयकुमार जयरामन यांचे मार्गदर्शन लाभले.

0 Comments