व्हॅलेंटाईन डे साजरा करतांना फुलराणीच्या बलिदानास विसरु नका



व्हॅलेंटाईन डे साजरा करतांना फुलराणीच्या बलिदानास विसरु नका

 प्राचार्या डॉ. रेखी - सारडा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी , प्राध्यापकांनी घेतली अत्याचार थांबविण्याची शपथ
    वेब टीम नगर ,दि. १२ -   हिंगणघाट घटनेतील फुलराणी कोमजली आहे, या आधीही अनेक निर्भयांचा अंत झालेला आहे. मात्र आरोपींना अजून फाशी झालेली नाही, निर्भया प्रकरणातील आरोपींना जर तात्काळ फाशी झाली असती तर फुलराणीसारख्या घटनांना चपराक लागली असती, हे कुठेतरी आता थांबले पाहिजे. युवक-युवती समाजाचे महत्वाचे घटक आहेत. या नाते समाजात जे काही चुकीची होत आहे, ते थांबविण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. यासाठी आपणही काही करु शकतो. सारडा महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी अशा घटना थांबविण्याची व विरोध करण्यासाठी घेतलेली सामुहिक शपथ प्रशांसनिय आहे. १४ फेब्रुवारीला युवक-युवती व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहेत. मात्र हा डे साजरा करतांना फुलराणीच्या बलिदानास विसरु नका. सारडा महाविद्यालयातील विद्यार्थी संवेदनशिल आहेत, हे आपण दाखवून देऊ, असे आवाहन पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अमरजा रेखी यांनी केले.
     हिंगणघाट येथील घडलेल्या घटनेचा निषेध करुन बळी पडलेल्या फुलराणीस श्रद्धांजली वाहण्यासाठी प्राचार्या डॉ.अमरजा रेखी यांच्या पुढाकाराने पेमराज सारडा महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आज सकाळी एकत्र जमले होते. वारंवार घडणार्‍या अत्याचारांच्या घटना थांबविण्यासाठी व त्यास विरोध करण्यासाठी प्रा.संजय धोपावकर यांनी सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांना सामुहिक शपथ दिली.
     प्रा.संजय धोपावकर म्हणाले, महाविद्यालयातील युवक-युवतींनी जागृत राहून वारंवार अत्याचार होणार्‍या घटना थांबविण्यासाठी विरोध केला पाहिजे. कित्येकदा आपल्यासमोर अशा घटना घडतात मात्र त्या मोबाईलमध्ये शूटींग करण्याव्यतिरिक्त कोणीही काही करत नाही. मात्र या घटनांना विरोध करण्याची व रोखण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. यासाठी सामुहिक शपथ घेऊन आजपासून आपण जागृत राहू. युवतींनीही वावरतांना जागृत रहावे, जर कोणी छेडछाड अथवा असभ्य वर्तन करत असेल त्यास तत्काळ विरोध करण्याचे डेअरिंग करावे.
     यावेळी प्रा.डॉ.दया जेठे, प्रा.प्रिती बोरा आदिंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे, पर्यवेक्षक प्रा.मंगला भोसले आदिंसह सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments