पंचमदा फॅन्स फौंडेशन पंचमदा फॅन्स फौंडेशन आयोजित ‘द लिजंडस्’ ग्रेटेस्ट हिटस् ऑफ बॉलीवूड संगीत संध्या

पंचमदा फॅन्स फौंडेशन पंचमदा फॅन्स फौंडेशन आयोजित 

 ‘द लिजंडस्’ ग्रेटेस्ट हिटस् ऑफ बॉलीवूड संगीत संध्या

 वेब टीम नगर,दि. १२  -  येथील सुप्रसिध्द पंचमदा फॅन्स फौंडेशनच्या वतीने दि.२२ फेब्रुवारी शनिवार रोजी माऊली संकूल सावेडी येथे सायंकाळी ७ वाजता ‘द लिजंडस्‘ हा जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. यात मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश, मन्नाडे, महेेंद्र कपुर, हेमंत कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले यांची लोकप्रिय गीते सादर होणार आहे. मागील १२ वर्षापासुन रसिकांची आवड लक्षात घेवून पंचमदा फॅन्स फौंडेशनने हिटस् ऑफ आर.डी.बर्मन, कल्याणजी आनंदजी हिटस, राजेश ांन्ना हिटस, लक्ष्मीकांत पॅरेलाल हिटस, हिटस ऑफ किशोर कुमार, यादें रफी, ओ.पी.नय्यर हिटस, यासारो अनेक यशस्वी कार्यक्रम सादर केले आहे. त्यांना रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.

     यावेळेस प्रथमच एका मंचावर मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश, मन्ना डे, हेमंत कुमार, महेंद्र कपुर, लता मंगेशकर, आशा भोसले, यांची सदाबहार गीते, सादर होणार आहेत. या कार्यक्रमात गायक म्हणून अभय कांकरिया, वाजिद खान, वैभवी कदम, आसिफ शेख, संगिता भावसार, डॉ.सत्तार सय्यद, संदिप भुसे इ.गायक आपले गीते सादर करणार आहेत. तर संगीताची बाजू अहमदनगर मधील नामवंत कलाकार दिलावर शेख, अजय साळवे, गौतम गुजर, अमोल कनगरे, अजित गुंदेचा, ललित भुमकर, अरूण वाघमारे, मनोज गुरव, हार्दिक रावल, फरहान शेा, संजय आठवले, हे सांभाळणार आहेत. सुप्रसिध्द निवेदक उस्मान पटणी हे निवेदन करणार आहेत. साऊंड व लाईट याची जबाबदारी शांती ऑडिओचे संचालक राजु ढोरे हे सांभाळणार आहेत. या कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका प्रॉमिनंट इंग्लिश अ‍ॅकॅडमी, माऊली संकूल समोर, सावेडी तसेच शांती ऑडिओ, चितळे रोड येथे उपलब्ध होणार आहेत.
     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय आडोळे,आलेश जोशी, हे विशेष परिश्रम घेत आहेत. अधिक माहितीसाठी संदिप भुसे-९८२२८७०६१८, डॉ.सत्तार सय्यद-९८९००५०३०५ यांच्याशी संपर्क साधावा. अशी माहिती पंचमदा फॅन्स फौंडेशनचे निलेश खरपुडे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments