न्यू इंडिया लॉन्ड्रीच्या दुसर्‍या शाखेचा शुभारंभ

आ.संग्राम जगताप -  व्यवसायात आधुनिकतेबरोबरच सेवा, विश्‍वासही महत्वाचा

   वेब टीम  नगर,दि. १२ -  शहराच्या वाढत्या विस्ताराबरोबरच जेवढी उपनगरे होत आहेत. तेवढ्याच प्रमाणात प्रत्येक व्यवसायाची वाढ होतांना दिसते पूर्वी दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी नगरलाच यावे लागते, पण आता घरपोहोच सेवेमुळे सारे आपल्या जवळ येत आहे. व्यवसाय कोणताही असो, त्यामध्ये किती आधुनिकता आली तरी ग्राहकांना दर्जेदार सेवेबरोबरच विश्‍वास देणे ही तितका महत्वाचा असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
 सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवरील श्रीराम चौकाजवळ न्यू इंडिया लॉन्ड्री या फर्मच्या दुसर्‍या शाखेचा शुभारंभ आ.जगताप यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या शुभारंभास माजी महापौर भगवान फुलसौंदर, अंबादास गारुडकर, माणिकराव विधाते, सुरेश गुंड, प्राचार्य बापूसाहेब गायकवाड, प्रा.देवराम शिंदे, हनुमंत भापकर, रवि गायकवाड, दत्तात्रय शेलार, उद्योजक विजयराव धाडगे, नानासाहेब भोसले, उत्तमराव तरटे, प्रतापराव झिने, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, संध्याताई पवार, बाळासाहेब पवार, माजी नगरसेवक निखिल वारे, अजिंक्य बोरकर, दत्ता सप्रे, रघुनाथ झिने, अ‍ॅड.शहाजी भापकर आदि मान्यवर उपस्थित होते.
     आ.जगताप पुढे म्हणाले, व्यावसायिक स्पर्धा वाढत आहे. नोकर्‍या मिळत नसल्याने प्रत्येक जण व्यवसायात उतरतो. व्यवसाय कोणताही असो, त्यामध्ये ग्राहकांचा विश्‍वास टिकविणे चांगली सेवा देणे या दोन गोष्टी चांगल्याप्रकारे सांभाळल्या तर यश निश्‍चित मिळते, असे ते म्हणाले.
     याप्रसंगी उत्तमराव तरटे, भगवान फुलसौंदर, निखिल वारे व मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रास्तविकात विश्‍वनाथ खराडे यांनी या व्यवसायाबद्दल माहिती दिली. प्रारंभी कोणताही व्यवसाय करतांना लगेच यश मिळत नाही. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी चांगली सेवा देऊन आपले कर्तव्य समजून आम्ही बोल्हेगांव येथे हा व्यवसाय सुरु केला होता. युरोपियन तंत्रज्ञान सुसज्ज मशिनरी प्लॅन्ट, अत्याधुनिक सेवा-सुविधांमुळे आज दुसर्‍या शाखेचा शुभारंभ करतांना आनंद होत आहे, असे सांगितले.
     या शुभारंभास ओबीसी महासंघाचे पदाधिकारी, बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नगरसेवक, माजी नगरसेवक, शहरातील व्यापारी, सावेडीमधील व्यावसायिकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन किशोर खराडे यांनी केले तर ज्ञानदेव खराडे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments