संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात

भिम आक्रोश बहुजन महासंघ व भिमशक्ती च्यावतीने

संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

    वेब टीम  नगर,दि. १० - भिम आक्रोश बहुजन महासंघ व भिमशक्तीच्यावतीने नगर शहरात व जिल्ह्यात संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती निमित्त भिम आक्रोश बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर बोरुडे (मामा) व भिमशक्तीचे शहर जिल्हाध्यक्ष संजूभाई जगताप, महाराष्ट्र राज्य संघटक किशोर वाघमारे यांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

     याप्रसंगी अध्यक्ष किशोर बोरुडे म्हणाले, संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे आचार व विचार समाजाने आचरणात आणून आत्मसात करावे, याची याची समाजाला अत्यंत गरज आहे. असे सांगून त्यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. व कार्यकर्त्यांनी समाज कार्यात सहभागी होवून अन्याय, अत्याचार विरोधात ठोस पावले उचलावीत, असे आवाहन केले.

     याप्रसंगी सेंट्रल बँक रिटारीज फेडरेशनचे रिजनल सेक्रेटरी शशिकांत कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शहर सरचिटणीस भिमराव बकरे, प्रदेशाध्यक्ष गणेश म्हैसमाळे, अन्वर शेख, निलेश डोळस, येशूदास वाघमारे, रंगनाथ एडके, हेमंत पाचारे, विशाल पाचारे, लतिफ शेख आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments