स्ट्राँग बाय झुंबा नृत्य प्रशिक्षण 5 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन


जागतीक महिला दिनानिमित्त फिट इंडिया व द युनिव्हर्सल फौंडेशन वतीने

 स्ट्राँग बाय झुंबा नृत्य प्रशिक्षण 5 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

    वेब टीम  नगर,दि. २९ - जागतीक  महिला दिनाच्या  औचित्याने द युनिव्हर्सल फौंडेशन फिट इंडियाच्या सहयोगाने दि. २ मार्च पासुन सावेडी झोपडी कॅन्टीन जवळ, युनिटी हॉस्पिटल शेजारी सुंदर भवन हॉल येथे ५ दिवसीय भव्य नृत्य प्रशिक्षण कार्यशाळेचे खास मुली व महिलांसाठी आयोजन करण्यात आल्यामाहिती संचालक सागर आलचेट्टी, व संचालीका आदीती उंडे, विश्रांती आढाव यांनी दिली.
     या प्रशिक्षणामध्ये अरेबिक्स, योगा, झुंबा, फिटनेस यासह नुत्याचे विविध प्रकार या ५ दिवसीय कार्यशाळेत शिकविले जाणार,  तज्ञ नृत्य दिग्दर्शक या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहे. मर्यादित पहिल्या पन्नास मुली-महिलांनाच प्रवेश दिला जाणार असुन कार्यशाळा यशस्वी करणार्‍या मुली- महिलांना द युनिव्हर्सल फौंडेशन व फिट इंडियाच्या वतीने प्रमाणपत्र व आकर्षक स्मृती चिन्ह देण्यात येणार आहे.
     तरी या कार्यशाळेच्या माध्यमातून आपला स्टॅमिना, स्ट्रेन्थ, आत्मविश्‍वास, फिजीकल फिटनेस सोशल स्कील, हॅपीनेस, जॉय असे अनेक लाभ युवती-महिलांना होणार आहेत. असे आवाहन सयोजकांनी केले. अधिक माहितीसाठी संपर्क मोबा.नं. ८९८३९८४९९९, ८०८७१३९९६० या क्रमांकावर संपर्क साधावा. फीट इंडीया या वेबसाईटवर नाव नोंदणी चालू आहे.

Post a Comment

0 Comments