अहमदनगर महाविद्यालयातील भूगोल विभागात माजी विद्यार्थी मेळावा


अहमदनगर महाविद्यालयातील भूगोल विभागात माजी विद्यार्थी मेळावा 


    वेब टीम नगर,दि. २८ - अहमदनगर कॉलेजमधील माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या कार्याक्षेत्रात जे यश संपादन केल्याचे  पाहून निश्‍चितच समाधान लाभते. महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रम तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिकविले जातात. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी होतो, ही महाविद्यालयासाठी गौरवाची बाब आहे.
आज माजी विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल पाहता महाविद्यालयातील  प्रत्येक प्राध्यापक घेत असलेल्या परिश्रमाचे चीज झाल्याचे दिसत आहे, असे प्रतिपादन अहमदनगर कॉलेजचे  प्राचार्य. डॉ. आर. जे. बार्नबस यांनी केले.
     भूगोल विभागाच्या वतीने आयोजीत माजी विद्यार्थी मेळाव्यास मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस बोलत होते. पुढे बोलताना  प्राचार्य. डॉ. बार्नबस यांनी सर्व माजी विद्यार्थांना अहमदनगर कॉलेज मधील विविध शैक्षणिक सुविधाचा त्यांच्या भविष्यकाळातही उपयोग करून घेण्याचे आवाहन केले. भूगोल विभाग द्वारा आयोजित या कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शैक्षणिक, राजकीय, व्यापारी व प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी मोठा संख्येने उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे प्रस्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. माया उंडे यांनी केले, तर प्रा. संजय नवले, प्रा. संतोष कांबळे व श्री. दिपक पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास  प्रा. जी. एल. उंडे , प्रा. डॉ. शरद बोरुडे, प्रा. माधव जाधव, प्रा. अजय काकडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. रजनी अडकमोल यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. दादा जवरे यांनी केले.
    सदर कार्याक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. बी. एम. गायकर, उपप्राचार्य. डॉ अरविंद नागवडे, उपप्राचार्य डॉ. सय्यद रज्जाक,  पुणे विद्यापीठ उप केन्द संचालक डॉ. नंदकुमार सोमवंशी व रजिस्ट्रर श्री. ए. वाय बळीद सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments