ज्ञानाची निर्मिती नामाच्या चिंतनातून होतेज्ञानाची निर्मिती नामाच्या चिंतनातून होते

ह.भ.प.नरवडे महाराज - आयोध्यानगरीत महाशिवरात्री उत्सवाची किर्तन-महाप्रसादाने सांगता

     वेब टीम नगर,दि. २८ -  नाम हे शाश्‍वत रुप आहे. नामस्मरण करुन पाहाव लागत त्यासाठी नामाशी नात जोडा महाशिवरात्री उत्सव हा नामाच महत्व सांगणारा असतो. ज्ञानाची निर्मिती नामाच्या चिंतनातून होते तर नामाचे चिंतन करणारा हा ज्ञानी होतो. असे निरुपण ह.भ.प. गोरक्षनाथ महाराज नरवडे यांनी केले.
     सावेडी उपनगरात पाईपलाईन रोडवरील श्रीराम चौकातील आयोध्यानगरीत महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सवाची सांगता किर्तन-महाप्रसादाने झाली. यावेळी भाविकांना आपल्या किर्तनातून महाशिवरात्रीचे महत्व व नामाचा महिमा या वर निरुपण करताना ह.भ.प.नरवडे महाराज बोलत होते.
     या सांगता सोहळ्यास प्रभागाचे नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, ह.भ.प.चाळक महाराज, दारकुंडे महाराज, मुरलिधर गुंड, संतोष थोरात, चंदुभाऊ देठे, पोर्णिमाताई नरवडे, राधाताई अभंग उपस्थित होते.
     ह.भ.प. नरवडे महाराज पुढे म्हणाले बारकाईने परमार्थ पाहयाचा असतो पण आपण परमार्थातच खुप बारकाई करतो. नाम हे परंपरेने मिळते भक्त सुद्धा परंपरेत तयार होत असतात लौकिक गोष्टीवरुन लायकी ठरते. चांगल असताना परमार्थ करावा भगवान शंकर ज्यांच चिंतन करतात त्यावर पार्वतीमातेच्या विश्‍वास नव्हता परमार्थात सशंय आला कि विनाश होतो. शंकर रामनामाचे चिंतन करीत आसताना संपूर्ण रामचरित्रच त्यांच्यासमोर आलं , असा हा नामाचा महिमा असतो. असे सांगून नरवडे महाराजांनी सांगितले कि पार्वती मातेने भगवान शंकराकडून नामाचा बोध घेऊन चिंतन केले तेव्हा भोळा शंकर प्रसन्न झाला. जगाच्या पाठीवर कुठेही नामस्मरण करा, त्याचा अनुभव येतोच 21 कुळांचा उद्धार नामस्मरणाने होतो. आपण जरी काळाला विसरलो तरी काळ मात्र आपल्याला विसरत नाही या काळावर विजय मिळविण्याची ताकद नामामध्ये आहे. ज्ञानी म्हणजे जो जास्त वाचन करतो तो नव्हे तर तो विद्धान असतो, नामाचे चिंतन करणारा खरा ज्ञाज्ञी होतो असे ह.भ.प.नरवडे महाराज यांनी शेवटी सांगितले.
     या किर्तनानंतर महाआरती करण्यात आली. महाआरती नंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या उत्सवासाठी किर्तनकारांचे आयोजन करणारे संभाजी काकडे, महाप्रसादासाठी अन्नदान करणारे संजय घनवट व ह.भ.प.नरवडे महाराज आदिंचा शंतनू पांडव यांचे हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिनकर थोरात यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री महादेव प्रतिष्ठानचे शिवाजी लगड, राजाराम चव्हाण, कैलास शेळके, दिनेश कुलकर्णी, सर्व सदस्य व नागरीकांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments