महाघाडीच्या काळात शेकऱ्यांची फसवणूक नागरिक, महिला असुरक्षित – महेंद्र गंधे

महाआघाडीच्या काळात  शेतकऱ्यांची फसवणूक

 नागरिक, महिला असुरक्षित – महेंद्र गंधे

वेब टीम नगर,दि. २६ -  भाजपाचा विश्वासघात करून राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेस बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची घोर निराशा करत  शेतक-यांचाही विश्वासघात केला आहे. महाघाडीच्या सरकार काळात शेकऱ्यांची फसवणूक झालीच शिवाय सर्वसामान्य जनताही असुरक्षित आहे. येत्या काळात जर कारभार सुधारला नाहीतर भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करणार आहे, असा इशारा भाजपाचे शहरजिल्ह्याध्याक्ष महेंद्र गंधे यांनी दिला.
          शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांची फसवणूक केली असून आघाडी सरकारच्या बेफिकीरीमळे राज्यत महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी नगर शहर भारतीय जनता पार्टीतर्फे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करत महाघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. अतिरिक्त जिल्हाधिकारी  पाटील यांना यावेळी निवेदन देण्यात आले.
          यावेळी वसंत लोढा म्हणाले, महाआघाडीच्या काळात कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याने महिलांवरील अत्याचार मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. नगरमध्ये अत्याचार, खून सारख्या अप्रिय घटनांमध्ये वाढ झाली आहे. राज्यातील सरकारला जाग यावी यासाठी संपूर्ण राज्यात भाजपाने आज आंदोलने केली आहेत.
 शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा
केली होती. पण महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाचा विसरपडला आहे. सरसकट कर्जमाफी करु, सातबारा कोरा करु अशा घोषणा करणा-यामहाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकि एकही आश्वासन पाळलेले नाही. सरकारी कर्जमाफी योजनाही शेतक-यांची सरसकट फसवणूक करणारी आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांची फक्त अल्प मुदतीची पीक कर्जे माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतक -यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांबाबत महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेत कसलाच उल्लेख नाही.
          भाजपा सरकारच्या कर्जमाफीत पीक कर्ज. तसेंच मध्यम मुदतींचे कर्ज समाविष्ट केल्याने पॉलीहाऊस, रोडनेट, शेती उपकरणे, पशुपालन, शेळी पालन, मधमाशी पालन अशासर्व प्रकारच्या शेतक-यांना लाभ मिळाला होता. भाजप सरकारच्या व्यापकं कर्ज माफीमुळे४३ लाख खाते धारकांना १९ हजार कोटींचा लाभ देण्यात आला होता. तूर खरेदीचे निकषमहाविकास आघाडी सरकारने बदलल्यामुळे शेतक-यांकडून होणा-या खरेदीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. शेतक-यांची घोर फसवणूक करणा-या महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करीत आहे.
          यावेळी उपमहापौर मालन ढोणे, सुरेखा विद्दे, गौतम दिक्षित, भिंगार मंडल अध्यक्ष वसंत राठोड, केडगाव मंडल अध्यक्ष पंकज जहागीरदार, मध्य मंडल अध्यक्ष अजय चितळे, किशोर बोरा, अनिल गट्टाणी, महावीर कांकरिया, गोकुळ काळे, विवेक नाईक, शाकीर सय्यद, नरेंद्र कुलकर्णी, जगन्नाथ निंबाळकर, संजय ढोणे, धनंजय जामगावकर, प्रकाश सैन्दर, सचिन चोरडिया, अनिल सबलोक, संग्राम म्हस्के, राहुल कांबळे, महेश नामदे, उमेश साठे, अमित पाथरकर, शरद मुर्तडक, विनोद भिंगारे, विलास नंदी, राहुल कांबळे, मनोज कोतकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
         


Post a Comment

0 Comments