नगर आकाशवाणी केंद्रावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे यांची रविवारी उन्हाळे-पावसाळे विषयावर मुलाखत

नगर आकाशवाणी केंद्रावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे
यांची रविवारी उन्हाळे-पावसाळे विषयावर मुलाखत

 
  वेब टीम नगर,दि. २२ - येथील गेली ५५ वर्षे वृत्तछायाचित्रकार व पत्रकार म्हणून काम करणारे ज्येष्ठ पत्रकर प्रकाश गोविंदराव भंडारे यांची मुलाखत प्रसार भारतीच्या अहमदनगर एफएम १००. ० वर उन्हाळे-पावसाळे या कार्यक्रमांतर्गत२० मिनिटांची मुलाखत रविवार दि२३ फेब्रुवारी रोजी सकाळी८.३०  ते ९ या दरम्यान प्रसारित केली जाणार आहे, अशी माहिती नगर आकाशवाणी केंद्राचे प्रमुख बाबासाहेब खराडे यांनी दिली.
     आकाशवाणीचे ग्रंथालय प्रमुख आभाळे व मुलाखतकार श्रीमती मिसाळ यांनी उन्हाळे-पावसाळे या कार्यक्रमांतर्गत प्रकाश भंडारे यांची मुलाखत ध्वनीमुद्रीत केली आहे. नगर शहरातील दैनिक लोकयुग (नगरचे नगराध्यक्ष, अर्बन बँक अध्यक्ष व शहराचे आमदार नवनीतभाई बार्शीकर यांच्या) डिसेंबर १९६९ पासून पत्रकारिता सुरु केली आहे. त्यानंतर सुरेश जोशी यांचे साप्ताहिक प्रवरा, दै.लोकक्रांति (संपादक - कॉ.बाबा गोसावी, कॉ.रामभाऊ सावंत), दै.गांवकरी (संपादक दादासाहेब पोतनिस) आणि नगर आवृत्ती संपादक बी.एड्. कॉलेजचे प्रा.विजय भागवत कुलकर्णी (एम.ए.एम.एड्.) १९७१ ते १९८५, साप्ताहिक ब्लिट्झ (संपादक रुषी करंजीया) व कॉ.विनायक भावे, किशोर देवधर, अ‍ॅड.पंढरीनाथ सावंत आदिंच्या काळात सुमारे १५वर्षे आणि त्यानंतर दै.मुंबई सकाळ (संपादक माधव गडकरी), दै.तरुण भारत (बेळगांव, गोवा, मुंंबई, कोल्हापूर) आदि ९ आवृत्त्यांच्या दैनिकांत (संपादक किरण ठाकूर, संस्थापक अध्यक्ष लोकमान्य मल्टीपरपझ को-ऑप सोसा.) १९८५ ते २०१६ सलग ३१ वर्षे अशा विविध वृत्तपत्रात बातमीदार प्रतिनिधी व वृत्तछायाचित्रकार म्हणून काम केले. १९८५ पासून ते आजतागायत युनाईटेड न्यूज ऑफ इंडिया (युएनआय, दिल्ली) या वृत्तसंस्थेसाठी नगर जिल्ह्याचा ब्युरोचिफ म्हणून काम पाहत आहेत.
     त्यांच्या मुलाखतीत नगर जिल्ह्यातील पत्रकारिता, राजकारण, वृत्तछायाचित्रण, आणि नगर शहर, जिल्ह्यातील विणकाम व्यवसाय, साळी समाज व त्यांचे दैवत जिव्हेश्‍वर महाराज आणि भंडारे यांनी नगर जिल्ह्यात प्रथम सुरु केलेल्या प्रवासी वाहतुकी संदर्भात आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतील त्यांच्या सरचिटणीस व कोषाध्यक्ष पदाच्या काळातील घटनांचा उल्लेख आहे. नगर जिल्ह्यातील एकमेव अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस आहेत. त्यांची ही मुलाखत आकाशवाणीच्या रसिक श्रोत्यांनी जरुर ऐकावी, असे आवाहन नगर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व नगर शहर सहकारी बँकेचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा  यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments