रविवारी बौद्ध वधू-वर परिचय मेळावा


रविवारी बौद्ध वधू-वर परिचय मेळावा

    वेब टीम  नगर,दि .२२  - दि बुद्धिस्ट वधू-वर सूचक केंद्राच्यावतीने रविवार दि. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत देवांग कोष्टी समाज सेवा मंडळ सभागृह, सावेडी नाका, बसस्टॅण्ड जवळ, अहमदनगर येथे भव्य बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
     या मेळाव्याचे उद्घाटन रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच यावेळी मागील वर्षापर्यंत नावनोंदणी झालेल्या वधू-वरांची यादी फलकावर लावण्यात येणार आहे. नवीन नावनोंदणी व अधिक माहितीसाठी मो.९८८१५३११८८ या नंबरवर संपर्क करावे, असे आवाहन भाऊसाहेब देठे यांनी केले आहे.
     मेळावा यशस्वीतेसाठी प्रा.दिलीप गायकवाड, सुनिल बोरुडे, महेंद्र पवार, एस.के. गायकवाड, विनायक वाकचौरे, किशोर वाघमारे, अनिल आंबावडे आदि प्रयत्नशील आहेत.

Post a Comment

0 Comments