आरोग्य शिबिरातून रुग्णांना दिलासा मिळतो

                                 
                 

आरोग्य शिबिरातून रुग्णांना दिलासा मिळतो

अंबादास गारुडकर -  केडगाव येथे कै.हरूबाई लोंढे यांच्या समरणार्थ सर्वरोग निदान शिबीर                                                                               
वेब टीम नगर,दि. २० -सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्यसेवा न परवडणारी आहे.मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरातून अनेकांना दृष्टी देण्याचे कार्य घडत आहे.रुग्णसेवा हीच खरी आरोग्यसेवा समजून मानवतेच्या दृष्टीकोनातून रुग्णसेवाचे कार्य कौतुकास्पद आहे.तज्ञ  डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे मोफत आरोग्य शिबिरातून रुग्ण सेवेचे दर्शन घडते.या शिबिरात अनेक गरजू रुग्णांना औषधपोचार देण्यात आल्याने सर्वरोग निदान शिबीरातुन रुग्णांना दिलासा मिळतो.असे प्रतिपादन समता परिषदेचे अंबादास गारुडकर यांनी केले.                  केडगाव लोंढे मळा येथे कै.हरूबाई लोंढे यांच्या १७व्या पुण्यतिथीनिमित्त डॉ.गोरे क्लिनिक,फिनिक्स फाउंडेशन,के.के.आय बुधरानी हॉस्पिटल( पुणे),लोटस हॉस्पिटल (केडगाव),अंजना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबीर सम्पन्न झाले.या शिबिरप्रसंगी समता परिषदेचे अंबादास गारुडकर बोलत होते.याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे,डॉ.सुदर्शन गोरे,भास्करराव लोंढे (कृषी उपसंचालक,पुणे),राजेंद्र लोंढे,अमोल लोंढे,माजी नगरसेवक संजय लोंढे,निलेश चिपाडे,शैलजा भुजबळ,बबन भुजबळ,रघुनाथ सोनवणे,शिंदे महाराज,नामदेव गवळी,अशोकराव गोरे,संजय गारुडकर, जयबजरंग मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.                                                             
सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे म्हणाले कि,लोंढे परिवारामुळे रुग्णसेवेचे कार्य शिबिराच्या माध्यमातून झाले आहे.सामाजिक बांधिलकी म्हणून केडगाव येथे सामाजिक कार्य सातत्याने करीत आहेत.समाजसेवेचा वसा लोंढे परिवाराला माऊलीपासून मिळाल्याने समाजकार्य होत आहे.      

Post a Comment

0 Comments