प्रकाश बोरुडे यांचे जहांगिर आर्ट गॅलरीत प्रदर्शन

प्रकाश बोरुडे यांचे जहांगिर आर्ट गॅलरीत  प्रदर्शन

     वेब टीम नगर,दि .२० - भारतीय वारसा स्थळांच्या (मोनुमेंटस् ऑफ इंडिया) चित्रांचे प्रदर्शन मुंबई येथील प्रसिद्ध जहांगिर आर्ट गॅलरी, कलाघोडा, फोर्ट, मुंबई येथे दि.  २४ फेब्रुवारी पर्यंत  असून, प्रख्यात चित्रकार प्रकाश बोरुडे यांनी या कलाकृती तयार केलेल्या आहेत.  सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव व इतर मान्यवरांच्या हस्ते दि. १८ रोजी सायंकाळी उद्घाटन  झाले .

या प्रदर्शनामध्ये भारतीय वारसा स्थळांच्या कलाकृती लावण्यातआल्या  असून, यात प्रामुख्याने मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, अत्यंत गजबजलेले क्रॉफर्ट मार्केट, मुंबई विद्यापीठ याच बरोबर वेरुळचे कैलास मंदिर, शिख बांधवांचे अमृतसर येथील पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर, दिल्ली येथील कुतूबमिनार, जगप्रसिद्ध सांचीचा स्तुप, वाराणसी येथील विविध घाट इत्यादी कलाकृती या प्रदर्शनाचे आकर्षण आहे.
     मूळचे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरीचे रहिवासी असलेले प्रकाश बोरुडे यांचे कला शिक्षण दिवंगत चित्रकार अर्जुनराव शेकटकर यांच्या मार्गदर्शनाखाली रचना कला महाविद्यालय  येथे झाले. कलेमधील उच्च शिक्षण पुण्यात झाले आहे. 
आजपर्यंत प्रकाश बोरुडे यांनी गेल्या १५ वर्षात भारतभर आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविले आहे. पुणे, मुंबई, दिल्ली, बंगलोर येथील आर्ट गॅलरीमध्ये त्यांनी भरविलेल्या प्रदर्शनास कला रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे. राज्य पातळीपासून राष्ट्रीय पातळीवर अनेक पारितोषिके व पुरस्कार मिळविणारा हा ग्रामीण भागातील कलावंत नगर जिल्ह्याचे कलाक्षेत्रातील नाव उज्वल करीत आहे.
     मंगळवार दि. २४ फेब्रुवारीपर्यंत  सकाळी ११ ते सायं. ७ या कालावधीत हे प्रदर्शन कलारसिकांसाठी मोफत असणार आहे. 

Post a Comment

0 Comments