सारेच शिवमय


सारेच शिवमय 

भगवे झेंडे ,भगवे फेटयांनी  शहर फुलून गेले ,  जय शिवाजी जय भवानीच्या घोषणांनी शहर दुमदुमले 
वेब टीम नगर,दि. १९ - तारखेनुसार होणाऱया छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी एसटी स्टँड परिसरातील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ शिवरायांच्या  प्रतिमेस   अभिषेक करण्यात आला. यावेळी मराठा विद्या प्रसारक मंडळ सारा विश्वस्त मंडळ उपस्थित होते  त्यात नंदकुमार झावरे ,जी डी खानदेशे, जयंत वाघ ,ॲड.आठरे , रेसिडेन्शियल स्कूलचे प्राचार्य आर्ट्स  कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य आणि इतर संस्थांचे प्राचार्य यावेळी उपस्थित होते.  संस्थेचे कर्मचारी शिक्षक शिक्षिका यांनी ही पारंपरिक वेशभूषेत यावेळी सहभाग दर्शविला तर या सर्व संस्थांच्या विद्यालयाची मुले आणि पारंपरिक वेशभूषा करून या कार्यक्रमात सहभागी झाले त्यामुळे भगवे झेंडे आणि फेठयांनी  परिसर सजल्या सारखा वाटत होता.

  यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन  करून मिरवणुकीला  प्रारंभ झाला यावेळी मुलांनी लेझीम, झांज, ढोल ,रिबिनी आदी  डाव प्रस्तुत केले यावेळी झालेल्या प्रात्यक्षिकात प्रत्येक संस्थेने आपले वैशिष्टय़पूर्ण डावांचे सादरीकरण  केले उपस्थितांनी या सर्व नृत्यांना  पसंती दर्शविली,यावेळी  मानवी मनोरे आणि तालबद्ध हालचाली सर्वांचे लक्ष वेधत होते.  त्यातच जय भवानी जय शिवाजी ,जय शिवराय अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला होता शहरातील मुख्य मार्गांवरून म्हणजे  माळीवाडा, पंचपीर चावडी, माणिक चौक, भिंगारवाला चौक,कापडबाजार, तेलीखुंट, चितळे रस्ता,चौपाटी कारंजा, दिल्ली दरवाजा, नीलक्रांती चौक मार्गे चौथे  छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी या मिरवणुकीचा समारोप करण्यात   आला .
चौकाचौकात या मिरवणुकीचे स्वागत करण्यात  आले या मिरवणुकीत छत्रपती शिवरायांची तसेच अन्य संत महतांची वेशभूषा केलेली मुले  सहभागी झाली  होती  त्यामुळे या मिरवणुकीला विशेष शोभा आली नेता सुभाष चौकात माजी आमदार अनिल भैय्या राठोड हेही मिरवणुकीत सहभागी झाले तरीही लेझीमचा डाव रंगविला त्यानंतर खाऊचे वाटप होऊन मिरवणूक  मार्गस्थ  झाली.

गेल्या २५ वर्षात अडथळा आणला नाही 
मिरवणुकीच्या वेळी माळीवाडा वेशीजवळ संस्थेचे पदाधिकारी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि पोलिसांच्यात किरकोळ बाचाबाची झाली माळीवाडा वेशीजवळ मिरवणूक थबकल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याचे पोलिसांचे म्हणने  होते तर गेल्या पंचवीस वर्षात मिरवणुकीत असा अडथळा आणला  नसल्याचा पदाधिकाऱ्यांचे मत  होते अखेर पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांनी मध्यस्ती करून त्यातून मार्ग काढला

Post a Comment

0 Comments